मी पार्थ पवार यांना विचारलं आपण एकत्र यायचं का? पण…, युगेंद्र पवार यांचा मोठा गौप्यस्फोट, सुप्रिया सुळे यांच्या घरी नेमकं काय घडलं?
शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी एकत्र येणार का ? यावरुन बराच खल सुरु आहे. सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचा पक्ष कोणासोबतही जाणार नाही असे म्हटले होते. आता शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी यावरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी एकत्र येणार का ? यावरुन बराच खल सुरु आहे.सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचा पक्ष कोणासोबतही जाणार नाही आणि विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नाही असे म्हटले होते. आता शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी दोन्ही राष्ट्रीवादी एकत्र येणार का ? यावरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शरद पवार गटाने पॅनल उभे केलं आहे, आम्हाला कारखान्याचे हित, सभासदांच हित, पाहायचं आहे, सहकार क्षेत्रामध्ये पवार साहेबांचं खूप मोठा अनुभव आहे असे यावेळी युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे. सोमेश्वर कारखाना निवडणूकी संदर्भात सुप्रिया सुळे यांच्या घरी चर्चा झाली का असे विचारता युगेंद्र पवार म्हणाले, की गैरसमज नसावा तिथे रेवती बऱ्याच दिवसानंतर लग्नानंतर घरी आली होती, ताईंनी आम्हाला तिथे बोलावल होते. मी तिथे सहज विचारलं की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला काय हरकत आहे. ? माळेगांव कारखाना फायद्यात आहे अस तरी मला वाटत नाही. तेथे पार्थ पवार यांच्यासोबत या निवडणुकीबाबत चर्चा झाली होती का ? यावर युगेंद्र पवार म्हणाले की, आपण पार्थ पवार यांना असे विचारलं आपण एकत्र का येत नाही ? त्यावर त्याचं म्हणणं अस आलं की कार्यकर्त्यांचा विरोध आहे त्यामुळे हे शक्य नाही असे त्यांनी सांगितले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.