AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रोचं काम जीवावर बेतलं ! उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेने गमावला जीव

मुंबईतील एका मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक पण तितकीच दुर्दैवी घटना घडली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड सीप्सजवळ मॅनहोलमध्ये पडून या महिलेने जीव गमावला.

मेट्रोचं काम जीवावर बेतलं ! उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेने गमावला जीव
मुसळधार पावसात उघड्या चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू
| Updated on: Sep 26, 2024 | 8:30 AM
Share

मुंबईत काल संध्याकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत प्रचंड पाणी साचलं होतं. हाच पाऊस एका महिलेसाठी कर्दनकाळ ठरला आहे. मुंबईतील एका मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक पण तितकीच दुर्दैवी घटना घडली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड सीप्सजवळ मॅनहोलमध्ये पडून या महिलेने जीव गमावला. सीप्झजवळ मेट्रो लाईन-3चे काम सुरू असून तेथील एक मॅनहोलचे झाकण उघडे होते. चालता चालता ती महिला त्या मॅनहोलजवळ पोहोचली, मुसळधार पावसामुळे ते झाकण उघडे असल्याचा तिला अंदाज नव्हता. अचानक ती खाली पडली आणि वाहून गेली.

घटनेची माहिती मिळताचअग्निशमन दलानं तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एक ते दीड तास सर्च ऑपरेशन राबवून त्यामहिलेला नाल्यातून बाहेर काढलं. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा जीव वाचू शकला नाही.

चालता चालता मॅनहोलमध्ये कोसळली आणि जीव गेला

मिळालेल्या माहितीनुसार, विमल गायकवाड ( वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. मुंबईत कालपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. काल रात्री विमल या काम संपवून रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास घरी परत जात होत्या. त्या सिप्झ कंपनीच्या परिसरात पोहोचल्या , रास्ता क्रॉस करत होत्या. तेथेच मेट्रोच्या कामासाठी खड्डा खणण्यात आला होता, मात्र त्यावर कोमतही झाकण टाकलेलं नव्हतं. क्रॉस करताना विमल यांना त्या खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्या धाडकन खाली कोसळल्या. तेथून त्या शंभर ते दीडशे मीटर दूरपर्यंत वाहून गेल्या.

महिला खड्ड्यात कोसळल्याचे समजताच अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. महिलेच्या शोधार्थ शोधमोहिमही सुरू करण्यात आली. तब्बल एक-दीड तास तिचा शोध सुरू होता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला शोधून बाहेर कआढल, तिला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. . सध्या एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मेट्रो 3 लाईनचे 5 तारखेला उद्घाटन होणार आहे. मात्र त्या पूर्वीच तेथे एका महिलेचा बळी गेला आहे.  या घटनेमुळे नागरिक संतापले असून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

डोंगरात खोदकाम सुरू असताना वीज कोसळून 2 तरुणांचा मृत्यू

कल्याण ग्रामीणमध्ये कांबा म्हारळगाव वरप जवळील पेट्रोल पंप परिसरात सुरू असलेल्या डोंगर खोदकामात आज एक दुर्दैवी घटना घडली. डोंगरात स्फोटकांचा वापर करून खाणकाम चालू असताना अचानक वीज पडली. त्यामुळे आपोआप स्फोटके फुटली. या स्फोटात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर मुरबाड मध्ये विजेच्या झटक्याने 42 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

Follow Us
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश