मुलींच्या शिक्षणासाठी आईची धडपड, थेट अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांक, अमृत दौड स्पर्धेत..

अंबाजोगाई येथे आयोजित अमृत दौड स्पर्धेत समाबाई रणवीर (वय 47) यांनी साडी परिधान करून अनवाणी धावत प्रथम क्रमांक पटकावला. पावसामुळे रस्ता चिखलमय असतानाही त्यांनी जिद्दीने धाव पूर्ण केली. पुण्यात शाळेच्या बसच्या अपघाताची घटना घडली.

मुलींच्या शिक्षणासाठी आईची धडपड, थेट अनवाणी पायाने धावत प्रथम क्रमांक, अमृत दौड स्पर्धेत..
Beed
| Updated on: Aug 31, 2026 | 9:26 AM

मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनवाणी धावत आईने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. अंबाजोगाई येथे आयोजित ‘अमृत दौड’ स्पर्धेत समाबाई रणवीर (वय 47) यांनी साडी परिधान करून अनवाणी धावत प्रथम क्रमांक पटकावला. पावसामुळे रस्ता चिखलमय असतानाही त्यांनी जिद्दीने धाव पूर्ण केली. विशेष म्हणजे, कोणतेही महागडे स्पोर्ट्स शूज किंवा प्रशिक्षण नसताना त्यांनी ही कामगिरी केली. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी 3 हजार रुपयांचे बक्षीसही जिंकले. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणींवर मात करत स्वयंपाकाचे काम करणाऱ्या समाबाईंची ही कामगिरी महिलांसह तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे. “मुलींच्या शिक्षणासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी मी मागे हटणार नाही,” असा संदेश त्यांनी दिला.

पुण्यातील वाघोलीत स्कूल बसचा भीषण अपघात, 15 विद्यार्थी सुखरूप आहेत. वाघोलीच्या रायसोनी कॉलेज रोडवर भारत पब्लिक स्कूलच्या बसने विद्युत खांबाला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बसमध्ये तब्बल 15 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली आणि विद्यार्थी सुखरूप आहेत.

मात्र, याच घटनेत रायसोनी कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे, बस चालक नशेत बस चालवत होता, या प्रकारामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं भीषण अपघात घडला आहे, भरधाव वेगात आलेल्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या चार जणांना जोराची धडक देत फरफटत नेले आहे.

या अपघातात दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले आहे. रेणापूर ग्रामीण रुग्णालया जवळ हा अपघात घडला आहे. मोटारसायकल रस्ता ओलांडताना ट्रकने जोराची धडक देत, फरफटत नेल्याची ही घटना आहे . या अपघातात प्रतीक क्षीरसागर ( वय 24) , कल्याणी घोबाळे ( वय 20) या बहीण भावडांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us