केतन अग्रवाल याच्यासोबत असेच व्हायला पाहिजे.. महिलेने घेतली थेट सियाची बाजू, 400 फूट खोल..
Ketan Agarwal Case : पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. यादरम्यान सिया गोयल हिच्याबद्दल लोकांमध्ये मोठा संताप आहे. एका महिलेने सिया गोयल हिची बाजू घेत धक्कादायक विधान केले.

पुण्यातील नामंकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाची अत्यंत धक्कादायक पद्धतीने हत्या करण्यात आली. होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराने तब्बल 400 फूट खोल दरीत विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन याला फेकून दिले. सुरूवातीला सांगण्यात आले की, सेल्फी घेत असताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी मिळून हत्येचा सर्व कट रचला. त्यांना कसेही करून आणि काहीही करून केतनला आपल्या रस्त्यातून काढायचे होते. लोहगडावरच यापूर्वीही तिने केतनला मारण्यासाठी प्लान तयार केला होता. तिने केतनला ढकलून देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी केतन वाचला. जर हा देखील 18 जूनला प्लान यांचा फसला असता तर केतनला अपघातात मारले जाणार होते. तसा प्लानही तयार करण्यात आला होता.
केतन अग्रवाल याची हत्या अत्यंत शांत डोक्याने सिया गोयल आणि तिचा प्रियकर क्रिकेटर चेतन चाैधरी यांनी केली. सिया गोयल हिला केतन याच्यासोबत लग्न करायचे नव्हते तर तिने याबाबत त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना सांगायला हवे होते पण बिचाऱ्या 26 वर्षीच केतनची अशी हत्या करायला नको होती, असे सर्वजण म्हणत व्यक्त होत आहेत. मात्र, यादरम्यान चक्क एका महिलेने सिया गोयल हिचे समर्थन केले. ही महिला फक्त इतक्यावरच थांबली नाही तर चेतनसोबत जे झाले ते योग्यच झाले, असेही तिने म्हटले.
ज्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला. प्रियंका देशमुख या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, केतन अग्रवाल याच्यासोबत हेच व्हायला हवे होते… प्रत्येक अरेंज्ड मॅरेजचा शेवट असाच असायला हवा… किंबहुना, मुलीच्या वडिलांनीही अशाच रोषाचा सामना केला पाहिजे. या महिलेने थेट केतन अग्रवाल याला 400 फूट खोल दरीत ढकलून देणाऱ्या सियाची बाजू घेतली.
Social media posts
या पोस्टने मोठी खळबळ उडाली. 26 वर्षाचा लेक विशाल अग्रवाल याने गमावला आहे. परदेशातून शिक्षण घेऊन केतन आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात काम करत होता. त्यामध्येच सिया अग्रवाल हिने जे केले ते योग्यच असल्याचे महिलेने म्हटल्याने मोठी खळबळ उडाली. जवळपास कोणालाच या महिलेचे हे बोलणे अजिबात आवडले नाही.