
Siddhant Shirsat : सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. लग्नासाठी मला धमकावण्यात आले तसेच माझा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप या महिलेने केला होता. तसेच मला 7 दिवसांच्या आत नांदायला घेऊन जावे अन्यथा कायदेशीर कारवाई करेल, अशी नोटीस या महिलेने आपल्या वकिलांमार्फत केला होता. त्यानंतर आता आरोप करणारी हीच महिला समोर आली आहे. मला हे प्रकरण वाढवायचं नाही. हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे, असं या महिलेनं म्हटलं आहे.
मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये. मला या प्रकरणाला पूर्णविराम द्यायचा आहे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी स्वताचं हित साध्य करत असल्याचं वाटतंय. हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे. मलाही आयुष्यात पुढे जायचं आहे, असं या महिलेनं म्हटलं आहे.
तसेच, माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण करू नये. सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असा इशाराच या महिलेने दिला आहे. मी परत एकदा सांगते मला हे प्रकरण थांबावायचं आहे. याबाबत संजय शिरसाट यांच्यासोबत बसून मी माझी भूमिका मांडणार आहे, अशी माहितीही या महिलेने दिली आहे. सिद्धांत शिरसाट यांना पाठवलेली नोटीस मी परत घेणार आहे, अशी माहितीही या महिलेने दिली आहे. मी त्यांच्यावर केलेले आरोप मागे घेतले आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
या महिलेने आपल्या वकिलाच्या मार्फत सिद्धांत शिरसाट यांच्या नावाने नोटीस दिली होती. या नोटिशीत त्यांनी माझा शारीरिक तसेच मानसिक छळ करण्यात आला आहे, असा आरोप केला होता. तसेच लग्न करण्यासाठी मला सिद्धांत शिरसाट यांनी वेगवेगवळ्या माध्यमातून धमकावलं असल्याचंही त्यांनी या नोटिशीत म्हटलं होतं. सोबतच सात दिवसांच्या आत मला नांदायला न नेल्यास मी वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करणार आहे, असा इशाराही या महिलेने सिद्धांत शिरसाट यांना दिला होता. आता मात्र ही नोटीस महिलेने वापस घेतली असून तिने केलेले हे सर्व आरोपही मागे घेतले आहेत.