AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, प्रांजल खेवलकरांचा पाय आणखी खोलात, अडचणी वाढणार

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता, दरम्यान या प्रकरणात आता प्रांजल खेवलकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे, मोठी बातमी समोर आली आहे.

पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, प्रांजल खेवलकरांचा पाय आणखी खोलात, अडचणी वाढणार
| Updated on: Aug 09, 2025 | 5:41 PM
Share

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पुण्यात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे, ते सध्या जेलमध्ये आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले होते,  मानवी तस्करीच्या अनुषंगाने खराडी प्रकरणाची चौकशी व्हावी, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

दरम्यान आता या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे, या प्रकरणात महिला आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. महिला आयोगाकडून पोलीस महासंचालकांना पत्र पाठवण्यात आलं आहे. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी, महिला आयोगाकडून पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे.

मानवी तस्करीच्या अनुषंगाने खराडी प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी असे पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालक यांना दिले आहे. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ आणि फोटो आढळले होते. त्यामुळे हा सगळा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. आता याच प्रकरणी त्यांनी थेट पोलीस महासंचालकाला पत्र देत सखोल चौकशी करुन महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल आणि ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हायला हवी, असं म्हटलं आहे.

महिलांना कशा प्रकारे आणले गेले, फसवणूक, दबाव टाकून या महिलांना पार्टीसाठी बोलवण्यात आलं होतं का? याची पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंध पथकाकडून (AHTU)  चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.  त्यासोबतच महिला अधिकाऱ्यांचा समावेश आलेली एसआयटी स्थापन करून, सखोल चौकशी आणि योग्य कारवाई करावी अशी मागणी देखील या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे