टी वन वाघिणीला मारलं, पण तिच्या बछड्यांनी वन विभागाला थकवलं!

यवतमाळ : नरभक्षक टी वन वाघिणीच्या दोन बचड्यांचा शोध घेता घेता वन विभागाची दमछाक झाली आहे. बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाची यवतमाळ जिल्ह्यातील अंजी परिसरात बुधवारी सकाळपासून शोधमोहिम सुरु होती. मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्यातील शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय या  चार हत्तींवर दोन पशुवैद्यकीय अधिकारी यांचं पथक बसून त्यांच्या साहाय्याने मोहिम यशस्वी करण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. अंजी […]

टी वन वाघिणीला मारलं, पण तिच्या बछड्यांनी वन विभागाला थकवलं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

यवतमाळ : नरभक्षक टी वन वाघिणीच्या दोन बचड्यांचा शोध घेता घेता वन विभागाची दमछाक झाली आहे. बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाची यवतमाळ जिल्ह्यातील अंजी परिसरात बुधवारी सकाळपासून शोधमोहिम सुरु होती. मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्यातील शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय या  चार हत्तींवर दोन पशुवैद्यकीय अधिकारी यांचं पथक बसून त्यांच्या साहाय्याने मोहिम यशस्वी करण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे.

अंजी या परिसरातील संपूर्ण 80 एकर परिसरात तार कुंपणसह कापडी कुंपण सुद्धा केले आहे. अंजी परिसरात वनअधिकारी आणि कर्मचारी वगळता कुणालाही जाण्यास बंदी करण्यात आली आहे. या जंगल भागात जाण्यासाठी असलेल्या सर्व रस्ते आणि पांदनरस्ते या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

2 नोव्हेंबरच्या मध्यरात्री टी वन वाघिणीला ठार केल्यानंतर तिच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. या दोन बछड्यांना आधी स्वतः शिकार करण्यासाठी सहज छोटे भक्ष अनेक ठिकाणी ठेवत एकाच जागेवर ठेवण्यात आलं.

टी वन वाघीण ठार झाल्यानंतर बछड्यांवर लक्ष ठेवण्यात आलं. आता ते दोन बछडे स्वतः शिकार करू शकतात, अशा प्रकारची शाश्वती मिळल्यानंतर आता बछड्यांना 24 डिसेंबरपर्यंत पकडण्यासाठी एक डेडलाईन वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडून ठेवण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, वन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी अंजी परिसरातील दोन बछडे ( सी1-नर, सी2- मादी ) यांना पकडण्यासाठी बैठक घेतली.

या बैठकीच्या निर्देशानुसार बुधवारी सकाळपासूनच बछड्यांना जेरबंद करण्याची मोहिम आखण्यात आली आहे. या परिसरामध्ये चार हत्तीवरून पाच ते सहा व्हेटर्नरी डॉक्टर यांचे दोन पथक तयार करून जंगलामध्ये शोध घेत त्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कोअर एरियामध्ये येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.