एसटी कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल, कर्मचाऱ्याच्या चुकीच्या वागणुकीमुळं प्रवासी संतप्त

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एसटी महामंडळाचा चालक बस एका हाताने चालवत आहे. एका प्रवाशाने हा व्हिडीओ तयार केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल, कर्मचाऱ्याच्या चुकीच्या वागणुकीमुळं प्रवासी संतप्त
ST news in marathi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 04, 2023 | 1:47 PM

यवतमाळ : एखादे वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, असा आरटीओचा नियम आहे. मात्र, वारंवार त्याचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. असाच एक प्रकार यवतमाळच्या (YAVATMAL ST NEWS) दिग्रस-पुसद मार्गावर पुन्हा उजेडात आला आहे. कंधार डेपोची एसटी (MSRTC) दिग्रस वरून पुढे जात असताना चालक चक्क बस चालवताना एका हातात मोबाईलवरती बोलत आहे. तर, दुसऱ्या हाताने स्टेअरिंग फिरवत आहे. दिग्रस-पुसद मार्गावरील धुंदी-घाटोडीच्या घाटातील एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल (VIDEO VIRAL) झाले आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांवर कुणाचा वचक नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. मागच्या काही दिवसांपासून एसटी महामंडळातील अनेक व्हिडीओ चव्हाट्यावर आले आहेत. एसटीचे कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वागत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. कारवाई केल्यानंतर सुध्दा कर्मचाऱ्यांमध्ये काहीचं बदल झालेला नाही.

चालकांवर होणार फौजदारी कारवाई

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बस चालक कामावर असताना, समजा मद्यप्राशन केल्याचं दिसून आल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होणार आहे. याबाबत महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयानं आदेश काढला आहे. राज्यातील सर्व बसस्थानकावर चालकांची “ब्रिथ अँनालॉयजर अल्कोहोल मशिन” च्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे.

चालक मद्यप्राशन केल्याचं आढळून आल्यास त्या चालकावर महामंडळ पोलिसांच्या माध्यमातून तात्काळ फौजदारी कारवाई करणार आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनेकदा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडं चालक मद्यप्राशन करून बस चालवतात आणि त्यामुळं अपघात वाढतात, अशा तक्रारी केल्या होत्या, त्यामुळं महामंडळानं हा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती पराग शंभरकर, सुरक्षा अधिकारी, परिवहन विभाग यांनी दिली आहे.