Wardha : वर्ध्यातील ‘त्या’ गृहरक्षक तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात

| Updated on: Jan 12, 2022 | 1:01 AM

आगीचे लोळ उठत असतानाच आजूबाजूच्या नागरिकांना तरुणीने पेटवून घेतल्याचे लक्षात येताच तिच्या शरीराला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरुणी 70 ते 80 टक्के भाजली होती. तिला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

Wardha : वर्ध्यातील त्या गृहरक्षक तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात
CRIME
Follow us on

वर्धा : पोलीस वसाहतीत चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या फ्लॅटसमोरच गृहरक्षक असलेल्या तरुणीने स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना पिपरी मेघे परिसरात असलेल्या पोलीस वसाहतीतील ‘शरद’ नामक बिल्डींगमध्ये रविवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या तरुणीचा नागपूर येथे उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी मर्ग दाखल करत तपासाला सुरवात केली आहे. (A young woman who was set on fire in wardha died during treatment)

आगीत तरुणी 70 ते 80 टक्के भाजली होती

मयत तरुणी ही गृहरक्षक दलात कार्यरत होती. तिने पिपरी परिसरात असलेल्या पोलीस वसाहतीतील शरद या बिल्डींगमध्ये स्वतःच्या शरीरावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले होते. आगीचे लोळ उठत असतानाच आजूबाजूच्या नागरिकांना तरुणीने पेटवून घेतल्याचे लक्षात येताच तिच्या शरीराला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरुणी 70 ते 80 टक्के भाजली होती. तिला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात

दरम्यान गृहरक्षक दलात कार्यरत असलेल्या तरुणीने अचानक असे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. (A young woman who was set on fire in wardha died during treatment)

इतर बातम्या

Mumbai Crime: चार महिन्याच्या मुलीला बापाने सावत्र चार लाखात विकलं, अटक आरोपी सरोगसी आणि आयव्हीएफ व्यवसायात सक्रिय

Amaravati : राजस्थानातून तेलंगणाकडे जाणारे 58 उंट अमरावती पोलिसांच्या ताब्यात; खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने कारवाई