AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime: चार महिन्याच्या मुलीला बापाने सावत्र चार लाखात विकलं, अटक आरोपी सरोगसी आणि आयव्हीएफ व्यवसायात सक्रिय

या घटनेतील मुख्य आरोपी इब्राहिम शेख हा आहे. तो मुलीला घेऊन गायब झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर मुंबईतील तपासासाठी पोलिसांनी अनेक पथक बनवली होती. छापे टाकून दोन महिला आणि चार पुरुष अशा एकूण सहा जणांना अटक केली.

Mumbai Crime: चार महिन्याच्या मुलीला बापाने सावत्र चार लाखात विकलं, अटक आरोपी सरोगसी आणि आयव्हीएफ व्यवसायात सक्रिय
चार महिन्याच्या मुलीला बापाने सावत्र चार लाखात विकलं
Reporter Sudhakar Kashyap
Reporter Sudhakar Kashyap | Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 11, 2022 | 11:05 PM
Share

मुंबई : आई कामानिमित्त बाहेरगावी गेली असताना चार महिन्यांच्या सावत्र मुलीला बापाने तामिळनाडूत विकल्याची घटना उघडकीस आली आहे. व्ही पी रोड पोलिसांनी आरोपी बापासह अन्य आरोपींना अटक केली आहे. चार महिन्याच्या या मुलीला तामिळनाडू येथे नेऊन 4 लाख 80 हजार रुपयांना विकण्यात आलं होतं. या मुलीला पोलिसांनी तिथे जाऊन ताब्यात घेऊन मुंबईत आणलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सरोगसी आणि IVF व्यवसायात सक्रिय असल्याचं उघडकीस आलं आहे.

पत्नी कामानिमित्त बाहेरगावी गेली असताना मुलीला विकले

फिर्यादी महिला आयवरी शेख ही व्ही पी रोड परिसरात राहते. तिच्या घरात तिने आरोपी इब्राहिम शेख आणि त्याची लिव्ह इन पार्टनर यांना भाड्याने ठेवलं होतं. इब्राहिमच्या पत्नीला एक चार महिन्याची मुलगी आहे. इब्राहिम याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेर गावी गेली आहे. यावेळी तिने आपल्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी घर मालकीन आयवरी शेख हिच्यावर सोपवली होती. तर तिचा पती इब्राहिम हा देखील घरीच होता.

27 डिसेंबर रोजी इब्राहिम याने आयवरी हिच्याकडून लस देण्याच्या बहाण्याने मुलीला ताब्यात घेतलं. त्यानंतर तो गायब झाला. तो परत न आल्याने आयवरी हिने व्ही पी रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. सुरुवातीला ही तक्रार अपहरणाबाबत करण्यात आली. नंतर तपास सुरू झाला. तपासात चार महिन्यांच्या मुलीला तामिळनाडू येथे विकण्यात आल्याचं उघडकीस आल्यावर पोलिसांनी दोन पथकं बनवून तामिळनाडू येथे पाठवली आणि मग मुलीला तामिळनाडू, कोईम्बतूर येथून ताब्यात घेतलं.

असा केला तपास

या घटनेतील मुख्य आरोपी इब्राहिम शेख हा आहे. तो मुलीला घेऊन गायब झाल्यानंतर पोलिसांनी प्रथम त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर मुंबईतील तपासासाठी पोलिसांनी अनेक पथक बनवली होती. मग सायन, धारावी, मालाड, जोगेश्वरी, नागपाडा, कल्याण आणि ठाणे या भागात आरोपीचा शोध घेतला. छापे टाकून दोन महिला आणि चार पुरुष अशा एकूण सहा जणांना अटक केली. त्यांनी अपहरण केलेल्या बलिकेला कर्नाटक, तामिळनाडू येथे नेलं असल्याचं त्यांनी सांगितल्यावर व्ही पी रोड पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी विनायक पाटील यांनी दोन टीम बनवून तामिळनाडू येथे पाठवल्या. या टीमने अनेक तासांचा तपास करून तिथे पाच जणांना अटक करून मुंबईत आणलं.

आतापर्यंत 11 आरोपी अटक

या गुन्ह्यात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. इब्राहिम शेख, शेर पीर खान, लक्ष्मी मुरगेश, सद्दाम शाह, अमजद मुन्ना शेख, रेश्मा गुलाब नबी शेख, कार्तिक राजेंद्रन, चित्रा कार्तिक, तमिळ सेलवन थंगराज, मूर्ती पालानि सामी, आनंद कुमार नागराज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यात अजून काही आरोपींचा समावेश आहे. तामिळनाडू येथून अटक करण्यात आलेली लोक ही सरोगसी आणि ivf मध्ये सक्रिय आहेत. ज्या जोडप्याला मुलं होत नाही त्यांना गाठून हे आरोपी मुलं विकत असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. या प्रकरणात एका डॉक्टरचाही सहभाग असून त्याचा आम्ही शोध घेत असल्याचं व्ही पी रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संध्याराणी भोसले यांनी सांगितलं. (The father sold the four-month-old daughter for Rs 4 lakh in mumbai)

इतर बातम्या

Amaravati : राजस्थानातून तेलंगणाकडे जाणारे 58 उंट अमरावती पोलिसांच्या ताब्यात; खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने कारवाई

‘आई आता आपण काय करायचं गं?’ अपघातात दगावलेल्या सलीलच्या मुलाचा सवाल, कुटुंब संकटात!

Follow Us
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...