Namdev Sasane : उमरखेड नगरपरिषदेत 65 लाखांचा कचरा घोटाळा, भाजपा तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव ससाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Feb 08, 2022 | 6:23 PM

स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट यामध्ये नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमध्ये नगरपरिषद अधिनियम 58 (2) अन्वये कार्योत्तर परवानगी घेऊन लाखोंची बिले काढल्याचा ठपका ठेवत तक्रार करण्यात आली होती. सदर तक्रारीवर तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी प्रकरणाची शहानिशा करून जिल्हाधिकारी यांना कामात अनियमितता झाल्याचा अहवाल सादर केला होता.

Namdev Sasane : उमरखेड नगरपरिषदेत 65 लाखांचा कचरा घोटाळा, भाजपा तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव ससाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल
भाजपा तत्कालीन नगराध्यक्ष नामदेव ससाने
Follow us on

यवतमाळ : नगराध्यक्ष पदाच्या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षणच्या कामात 65 लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी उमरखेडचे भाजप आमदार नामदेव ससाने(Namdev Sasane) यांच्यासह 11 जणांविरोधात कलम 420 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या आदेशावरून मुख्याधिकारी यांनी तक्रार दिली होती. सर्वेक्षणच्या कामात नियमबाह्य पद्धतीने मर्जीच्या व्यक्तीला काम दिले आणि त्याच्या नावावर पैसे उचचले, असा ससाने यांच्यावर आरोप आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये घनकचरा संकलन व विल्हेवाटीचा कामात नगरपरिषदेचा 65 लाखाचा घोटाळा उमरखेड येथे उघडकीस आला आहे. नामदेव ससाने यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Filed a case against the then mayor Namdev Sasane in the garbage scam case)

कामात अनियमितता झाल्याचा अहवाल आल्यानंतर नगरविकास मंत्रालयाने कारवाईचे आदेश दिले

स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट यामध्ये नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या कामांमध्ये नगरपरिषद अधिनियम 58 (2) अन्वये कार्योत्तर परवानगी घेऊन लाखोंची बिले काढल्याचा ठपका ठेवत तक्रार करण्यात आली होती. सदर तक्रारीवर तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी प्रकरणाची शहानिशा करून जिल्हाधिकारी यांना कामात अनियमितता झाल्याचा अहवाल सादर केला होता. यावर नगरविकास मंत्रालयाने शिक्कामोर्तब करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून आज सोमवारी उशिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

नगराध्यक्षांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल

उमरखेड नगरपरिषदेच्या कचरा संकलन घोटाळ्यात नगराध्यक्ष नामदेव ससाने, तत्कालीन मुख्याधिकारी गणेश चव्हाण, कंत्राटदार गजानन मोहळे, कंत्राटदार फिरोजखान आजाद खान, मजुर पुरवठादार पल्लवी इंटरप्राईजेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रशेखर जयस्वाल, तत्कालीन पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, आरोग्य सभापती अमोल तिवरंगकर, महिला व बालकल्याण सभापती सविता पाचकोरे यांच्यासह लेखापाल सुभाष भुते, आरोग्य निरीक्षक विशाल श्रीवास्तव अशा एकूण अकरा जणां विरुद्ध कचरा संकलन घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळल्याचे नगर विकास मंत्रालय आदेशात म्हटले होते. यावरून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर संबंधितांवर पोलिसात तक्रार देण्याची जबाबदारी दिली होती. यावरून मुख्याधिकारी यांनी 6 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीवर ठाणेदार अमोल माळवे यांनी दस्तऐवजाची पडताळणी सुरू करून आज 7 फेब्रुवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

उमरखेड शहरातील मतदारांनी लोकशाहीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावून भाजप नगराध्यक्ष लोकनियुक्त निवडून दिला. त्याचबरोबर भाजपाचे काही सदस्य निवडून दिले. त्याच्याच जोरावर भाजप-शिवसेना राष्ट्रवादी अशी तिन्ही पक्षांनी मिळून नगरपरिषदेमध्ये सत्ता स्थापन केली. ज्या लोकांवर लोकशाहीच्या माध्यमातून मतदारांनी विश्वास दाखवून आपल्या मतदानाच्या हक्काच्या जोरावर निवडून दिले. तेच लोक आज जनतेच्या पैशाची राखरांगोळी करत जनतेच्या व मतदारांचा विश्वास घात करीत आहेत. (Filed a case against the then mayor Namdev Sasane in the garbage scam case)

इतर बातम्या

Nanded Crime : जादूटोणा आणि उपचाराच्या नावाखाली नागरिकांना लुटणाऱ्या भोंदू बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश

Nashik accident | कर्मचाऱ्याच्या अंगावर गरम डांबराचा ट्रक उलटला; नाशिकमध्ये भीषण अपघात