Yavatmal Crime | बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर धाड, 5 लाख रुपयांचे साहित्य जप्त

| Updated on: Mar 16, 2022 | 4:43 PM

यवतमाळ पोलिसांनी आज मोठी कारवाई केली. बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. यात सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. हा कारखाना एक गुंड चालवित असल्याचं पुढं आलं. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून हे सारं सर्रासपणे सुरू होतं.

Yavatmal Crime | बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर धाड, 5 लाख रुपयांचे साहित्य जप्त
यवतमाळ येथे बनावट दारू कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली.
Image Credit source: tv 9
Follow us on

यवतमाळ : यवतमाळ शहरातील गोदनी भागात (In Godni area of ​​Yavatmal city) बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्यावर अवधुतवाडी पोलिसांनी (Avadhutwadi police) धाड घातली. गेल्या 2 वर्षांपासून बनावट दारूचा कारखाना सुरू होता. अवैधरित्या स्पिरीट भरून खाली बाटल्यांमध्ये दारू भरून शहरात विक्री केली जात होती. या धाडीत अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल दारूसाठा जप्त करण्यात आला. भय्या उर्फ दीपक यादव नामक गुंड ( a goon named Deepak Yadav ) हा बनावट दारूचा कारखाना चालवित होता. पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक दर्शन डिकोंडवार, सुधीर पुसदकर यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

अशी केली जात होती बनावट दारू

गोदनी भागात पोलिसांनी धाड टाकली तेव्हा असे लक्षात आले की, एका माठात स्पिरीट भरून ठेवले जात होते. त्यातून ते स्पिरीट चाळणीच्या साहाय्याने खाली काचेच्या बाटलीत भरले जात होते. त्याला दारूच्या फ्लेवर यावा यासाठी केमिकल मिक्स करण्यात येत होते. कुठल्याही मशीनविना काचेच्या तुकड्याच्या साहाय्याने बाटलीच्या झाकणाला सील केले जात होते. या सर्व गैरकारभारामध्ये अल्पवयीन मुलांचा सुद्धा वापर करण्यात येत होता. बाटली भरल्यानंतर दारूच्या खोक्यामध्ये भरून शहरातील दुकानांमध्ये गाव खेड्यावर सर्रास विक्री केली जात होती.

मद्यपींच्या आरोग्याशी खेळ

आतापर्यंत ही बनावट दारू पिणारे दारूच पित होते की, स्पिरीट असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत या बनावट दारू पिणाऱ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम झाले, याचा विचार करणे गरजेचे आहे. या स्पिरीटनं बनावट दारू पिणाऱ्यांचे आरोग्य अधिकच बिघडविले की, काय अशी शंका आहे. या दृष्टीने या घटनेचा तपास करणे गरजेचे आहे.

Video – नागपूरच्या सुदाम टॉकीजबाहेर नारेबाजी, BJP युवा मोर्च्याने जय श्री रामचे लावले नारे

photo – वाशिममध्ये दोन मोटारसायकल समोरासमोर भिडल्या, अपघातात शिक्षक ठार, दोन जण गंभीर 

नागपुरातील दोघे मित्र दारू पित बसले, झिंग चढल्यानंतर वाद झाला, त्यात एक जिवानीशीचं गेला!