Marathi News » Maharashtra » Washim » In washim two motorcycles collided head on killing one teacher and seriously injuring two others
photo – वाशिममध्ये दोन मोटारसायकल समोरासमोर भिडल्या, अपघातात शिक्षक ठार, दोन जण गंभीर
वाशिम जिल्ह्यातील सवडजवळ दोन मोटारसायकल समोरासमोर भिडल्या. या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला. तर दुसरे दोन जण जखमी झाले. सवडजवळ असलेल्या कोविड सेंटरजवळ हा अपघात झाला.
Mar 16, 2022 | 4:55 PM
विठ्ठल देशमुख | Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल
Mar 16, 2022 | 4:55 PM
रिसोड -वाशिम मार्गावरील सवडजवळ दोन मोटारसायकलचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात एका जणाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले.
1 / 5
वाशिम - सवडपासून जवळच असलेल्या कोविड सेंटरजवळ मोटरसायकल व बुलेट यांचा समोरासमोर धडक झाली.
2 / 5
अपघातातील जखमींना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
3 / 5
या अपघातात रिठद येथील शिक्षक महादेव बोरकर याचा जागीच मृत्यू झाला तर रिसोड रामनगर येथील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
4 / 5
वाशिम येथे झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला.