AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होय मी राजकीय स्टँड घेतलाय, 2029 ला कोणाला पाठिंबा? अभिजीत दिपकेंचं सर्वात मोठं वक्तव्य

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सीजेपीच्या वतीने मोठं आंदोलन उभारण्यात आलं. त्यानंतर आता टीव्ही 9 मराठीशी बोलताना राजीकय भूमिकेबाबत अभिजीत दिपके यांनी मोठं विधान केलं आहे.

होय मी राजकीय स्टँड घेतलाय, 2029 ला कोणाला पाठिंबा? अभिजीत दिपकेंचं सर्वात मोठं वक्तव्य
Abhijit DipkeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 01, 2026 | 7:51 PM
Share

नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक असलेल्या अभिजीत दिपके यांनी या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी ते अमेरिकेमधून भारतात आले, भारतात आल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन उभारण्यात आलं.  शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी तब्बल महिनाभर दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता अभिजीत दिपके यांनी ‘टिव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली आहे. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये बोलताना दिपके यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

राजकीय भूमिकेबद्दल दिपके नेमकं काय म्हणाले?

‘आम्हाला राजकीय स्टँड घ्यावाच लागेल, त्या शिवाय राहू शकत नाही. आपण गाडीत पेट्रोल टाकतो, पेट्रोलच्या किंमती राजकारणी ठरवतात. टुथब्रशच्या किंमतीही सरकारच ठरवतं. जे म्हणतात आय एम ए पॉलिटिकल, त्यांना सांगतो तुम्ही ए पॉलिटिकल नाही, तुम्ही इग्नोरंट आहात. मी राजकीय आहे. मी क्लिअरली सांगतो. आम्ही धर्मेंद्र प्रधानांच्यामध्ये राजकीय स्टँड घेतला. आम्ही २०२९ पर्यंत पॉलिटिकल स्टँड घेण्याचा ऑप्शन घेतला आहे, आमचा स्टँड हा मुद्द्यांवर असेल, असं यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे.

दरम्यान माझा कोणत्याही राजकीय पक्षाकडे कल नाही,  स्वतंत्र राहा असंच जेन जीला मी सांगेल. राजकीय लोकांमध्ये हिरो बघू नका. तुम्ही इतरांना मोठं कराल तर ते तुमची इज्जत ठेवणार नाही. तुम्ही स्वत: तुमचे हिरो बना. राजकारणी, क्रिकेटर आणि कलाकारांमध्ये हिरो पाहू नका, असं आवाहान यावेळी अभिजीत दिपके यांनी केलं आहे. दरम्यान आता आम आदमी पक्षाशी माझा संबंध नाही. कॉकरोच जनता पार्टीचाही संबंध नाही. पण आपमध्ये माझे खूप मित्र आहेत, त्यांच्या संपर्कात  मी आहे पण पार्टीत संबंध नाही, असंही यावेळी दिपके यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक