AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिममध्ये आला व्यायाम केला, पाणी पिताच तरुणाला मृत्यूनं गाठलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पिंपरी चिंचवडमध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. मिलिंद कुलकर्णी असं या तरुणाचं नाव आहे.

जिममध्ये आला व्यायाम केला, पाणी पिताच तरुणाला मृत्यूनं गाठलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2025 | 8:08 PM
Share

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पिंपरी चिंचवडमध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. मिलिंद कुलकर्णी असं या तरुणाचं नाव आहे. ही घटना चिंचवड गावातील नायट्रो जिममध्ये घडली आहे.जिममध्ये ते नेहमी प्रमाणे व्यायाम करत होते, याचदरम्यान त्यांना भोवळ आली, आणि ते जागेवरच कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. भोवळ येऊन जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांना तेथून जवळच असलेल्या मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून व्यायामासाठी या जिममध्ये येत होते.आजही ते नेहमी प्रमाणे या जीममध्ये व्यायामासाठी आले, त्यांनी व्यायाम केला, त्यानंतर ते एका ठिकाणी बसले, त्यांनी पाणी पिलं, त्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले, त्यानंतर जिममध्ये जे व्यायाम करण्यासाठी इतर जण आले होते, त्यांनी तातडीनं मिलिंद कुलकर्णी यांना तिथून जवळच असलेल्या मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतात, आज सकाळी देखील ते व्यायामासाठी गेले होते. व्यायाम केल्यानंतर ते जिममध्ये एका ठिकाणी बसले, त्यांनी पाणी पिलं आणि त्यानंतर अचानक त्यांना भोवळ आली, ते खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मिलिंद कुलकर्णी यांची पत्नी देखील एक डॉक्टर आहे, या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच