कलम 370 मुळे दहशतवाद देशात फोफावला : अमित शाह

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Goregaon) रविवारी (22 सप्टेंबर) मुंबईत येत आहेत.

कलम 370 मुळे दहशतवाद देशात फोफावला : अमित शाह

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Goregaon) रविवारी (22 सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर आले आहेत. गोरेगावमधील नेस्को सभागृहात त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी कलम 370 मधील बदल आणि जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयावर भाष्य केलं.

अमित शाह यांनी आपल्या भाषणात कलम 370 वर बोलताना विरोधी पक्षांना चांगलंच लक्ष्य केलं. ते म्हणाले, “कलम 370 आणि ’35 अ’ला जनसंघ आणि भाजपकडून पहिल्यापासूनच विरोध राहिला आहे. भारतीय जनसंघाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच काश्मीरसाठी पहिलं बलिदान दिलं. काश्मीरमधून कलम 370 न हटवणं हा काँग्रेससाठी राजकीय मुद्दा होता. मात्र, कलम 370 हटवणं हा भाजपसाठी भारताला एकसंघ ठेवण्याचा मुद्दा होता. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला आहे.”

शाह यांनी यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, “राहुलबाबा, तुम्ही आत्ता राजकारणात आलात. आमच्या 3 पिढ्यांनी काश्मीरसाठी बलिदान दिलं आहे.

“कलम 370 मुळे दहशतवाद देशात फोफावला”

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 मुळेच दहशतवाद फोफावल्याचा आरोपही शाह यांनी केला. कलम 370 मुळे पाकिस्तानच्या हाती आयतं कोलीत मिळालं. जम्मू काश्मीरमधील सूफी संत आणि काश्मिर पंडितांना बाहेर हाकलण्यात आलं. 40 हजार जणांचे जीव गेले. देशात दहशतवाद फोफावला. अनेक विकास कामं खोळंबली. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. महत्त्वाच्या कायद्यांची अंमलबजावणी करता आली नाही.”

Live Updates

Picture

कलम 370 मुळे दहशतवाद देशात फोफावला : अमित शाह

22/09/2019,1:26PM
Picture

राहुलबाबा, तुम्ही आता राजकारणात आलात, आमच्या तीन पिढ्यांनी काश्मीरसाठी बलिदान दिलं आहे : अमित शाह

22/09/2019,1:26PM
Picture

भ्रष्टाचार नसता तर प्रत्येक काश्मीरी नागरिकाच्या घराच्या छतावर सोन्याचे पत्रे असते : अमित शाह

22/09/2019,1:23PM
Picture

काश्मीरमधून कलम 370 न हटवणं काँग्रेससाठी राजकीय मुद्दा : अमित शाह

22/09/2019,1:16PM
Picture

काश्मीरसाठी पहिलं बलिदान भारतीय जनसंघाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जींनी दिलं : अमित शाह

22/09/2019,1:15PM
Picture

कलम 370 हटवल्याने काश्मीर भारताचा अविभाज्य भाग: अमित शाह

22/09/2019,1:14PM
Picture

देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार : अमित शाह

22/09/2019,1:09PM
Picture

निवडणुकीपूर्वी काहीही झालं नाही तरी भाजपचाच विजय, अमित शाहांचा शरद पवारांना टोला

22/09/2019,1:08PM
Picture

सत्तर वर्षांनी जम्मू, श्रीनगर, लडाखमध्ये भारताचा तिरंगा फडकला : फडणवीस

22/09/2019,12:57PM
Picture

अमित शहा गोरेगाव सभास्थळी दाखल

अमित शहा गोरेगाव सभास्थळी दाखल, मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते हजर, मोठ्या जनसमुदायासमोर कलम 370 वर मांडणी करणार

22/09/2019,12:37PM
Picture

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल

अमित शाह मुंबईत दाखल, गोरेगावमधील सभेसाठी प्रस्थान, थोड्याच वेळात सभेला संबोधित करणार

22/09/2019,12:30PM

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अमित शाह यांनी गोरेगाव येथील जनसभेला संबोधित केलं. दरम्यान, शाह भाजप-शिवसेनेवर काही चर्चा करणार का किंवा युतीची काही घोषणा करणार का? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. त्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार का याबाबतही अनेक अंदाज लावले गेले. मात्र, शाह यांच्या दिवसभरातील कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरेंच्या भेटीचा कोणताही अधिकृत उल्लेख नाही.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *