गटबाजी चव्हाट्यावर, अशोक चव्हाण राजीनाम्याच्या मनस्थितीत?

मुंबई: ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. पक्षात कोण ऐकत नसल्यानं अशोक चव्हाण राजीनाम्याच्या मनस्थितीत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांची  चंद्रपुरातल्या कार्यकर्त्यांसोबतची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. त्यावरुन अशोक चव्हाण अंतर्गत गटबाजीमुळे वैतागल्याचं दिसून येतं. चंद्रपूरमध्ये काँग्रेसने लोकसभेसाठी विनायक बांगडे […]

गटबाजी चव्हाट्यावर, अशोक चव्हाण राजीनाम्याच्या मनस्थितीत?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई: ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. पक्षात कोण ऐकत नसल्यानं अशोक चव्हाण राजीनाम्याच्या मनस्थितीत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांची  चंद्रपुरातल्या कार्यकर्त्यांसोबतची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. त्यावरुन अशोक चव्हाण अंतर्गत गटबाजीमुळे वैतागल्याचं दिसून येतं.

चंद्रपूरमध्ये काँग्रेसने लोकसभेसाठी विनायक बांगडे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र बांगडे यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांजवळ नाराजी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांनी चव्हाण आणि वडेट्टीवार यांच्याशी केलेली संभाषण क्लिप वायरल झाली. दोघेही राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

ती ऑडियो क्लिप मी ऐकलेली नाही. जी कार्यकर्त्यांची भावना आहे तीच माझी भावना आहे. आमची जशी उमेदवारीबद्दल चर्चा होते, तशी उमेदवारी जाहीर केली जाते. त्या ऑडीओ क्लिपचा काही संबंध नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.

अब्दुल सत्तार यांना उमेदवारी हवी असल्यास त्यांनी लोकसभा लढवावी. त्यांना कुठे पाहिजे तिथं उमेदवारी दिली असती. त्यांच्या उमेदवारीचा काही विषय नाही. अपक्ष लढायची काही गरज नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले.

रत्नागिरी सिंधुदुर्गात बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम आहे. त्यांच्या उमेदवारीवर काही वाद नाही. आम्ही विचारपूर्वक उमेदवारी दिली आहे.  समाजाच्या कामासाठी ते स्टेजवर गेले होते, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.