Best Strike: शशांक रावांनी कामगारांना फसवलं: शिवसेना

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरुन बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर, शिवसेनेने शशांक राव यांच्यावर पलटवार केला आहे. “शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करुन त्यांची माथी भडकवली. बेस्ट कर्मचाऱ्यांना 7 हजार रुपयांची पगारवाढ मिळणार नाही. त्यांना तीन ते साडेतीन हजार रुपयांचीच पगारवाढ मिळेल. ज्यांना 7 हजार रुपायांची  पगारवाढ मिळेल, […]

Best Strike: शशांक रावांनी कामगारांना फसवलं: शिवसेना
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरुन बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर, शिवसेनेने शशांक राव यांच्यावर पलटवार केला आहे. “शशांक राव यांनी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करुन त्यांची माथी भडकवली. बेस्ट कर्मचाऱ्यांना 7 हजार रुपयांची पगारवाढ मिळणार नाही. त्यांना तीन ते साडेतीन हजार रुपयांचीच पगारवाढ मिळेल. ज्यांना 7 हजार रुपायांची  पगारवाढ मिळेल, त्यांनी पगारस्लिप दाखवावी”, असं आव्हान शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिलं. अनिल परब यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शशांक राव यांच्यावर घणाघाती आरोप केले.

शशांक राव यांनी स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी संप ताणला. कोणत्याही कामगाराचे 7 हजार वाढणार नाहीत. शिवसेनेला बदनाम करणं हा अदृश्य हाताचा हेतू होता. तोच त्यांचा राजकीय अजेंडा आहे, असा आरोप अनिल परब यांनी केला.

“कामगारांना न्याय मिळाला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे शिवसेनेने मध्यस्थाची भूमिका बजावली. या संपादरम्यान सुवर्णमध्य साधता यावा यासाठी आम्ही पर्यत्न केले. जेव्हा संप मागे घेतला तेव्हा कोर्टाची ऑर्डर हातात आली नव्हती. कोर्टाने दिलेले आदेश आणि शशांक राव यांनी जे कामगारांना सांगितले त्यात तफावत आहे. कामगारांची 9 दिवस माथी भडकवण्याचं काम शशांक राव यांनी केले”, असं अनिल परब म्हणाले.

कामगारांनी कोर्टाच्या आदेशाचा नीट अभ्यास करावा, त्यानंतर कर्मचाऱ्यांना आपल्या हातात काहीच पडलं नसल्याचं समजेल, असं अनिल परब म्हणाले.

मुंबई पालिका आणि बेस्ट यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेची सत्ता होती तेव्हा कामगार आणि बेस्ट मध्ये जेव्हा जेव्हा संघर्ष झाले तेव्हा शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली. या संपाला शिवसेनेच्या युनियनचा नैतिक पाठिंब होता, मात्र हे प्रकरण कोर्टात गेल्याने संपावर बाहेर तोडगा काढणं अवघड झालं, असं अनिल परब यांनी नमूद केलं.

बेस्टच्या विलिनीकरणाला विरोध नाही

यावेळी अनिल परब यांनी बेस्टच्या विलीनीकरनाला शिवसेनेचा विरोध नाही, असं स्पष्ट सांगितलं. बेस्टच्या विलिनीकरणाबाबत शिवसेनेने आपली कामगिरी केली आहे, मात्र त्याला युनियनने विरोध करुन त्यातील अटी काढल्या, तोपर्यंत हा विषय कोर्टात गेला, कोर्टाच्या निकालानंतर त्याबाबत निर्णय होऊ शकतो, असं अनिल परब यांनी सांगितलं.

संप करुन काही मिळत नाही, चर्चेतून मार्ग निघतो हे आता या संपावरुन बेस्ट कर्मचाऱ्यांना समजले. त्यामुळे ते आता शशांक राव यांच्या बोलण्याला बळी पडणार नाही, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

‘या’ 10 निकषांवर ‘बेस्ट’चा संप मागे  

उद्धव ठाकरेंना किती मदत करायची हे आता बेस्ट ठरवेल: शशांक राव

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.