बाळासाहेबांचे वंशज स्वातंत्र्यवीर सावकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील का? : चंद्रकांत पाटील

भाजपच्यावतीन आज राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनात अडीच लाख नागरिक सहभागी झाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil slams Shiv Sena).

बाळासाहेबांचे वंशज स्वातंत्र्यवीर सावकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतील का? : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 5:11 PM

मुंबई : “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची उद्या पुण्यतिथी आहे. महाराष्ट्र शासन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनंदनाचा ठराव मांडतं का? ते बघूया”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपच्यावतीने आज राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनात अडीच लाख नागरिक सहभागी झाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. मुंबईच्या आझाद मैदानातही धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर भाजपची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला (Chandrakant Patil slams Shiv Sena).

“उद्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे. बघूया महाराष्ट्र शासन सभागृहामध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतं का? ज्या सावरकरांवर यांची प्रचंड भक्ती आणि श्रद्धा आहे, बाळासाहेबांना तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना कुणी काही म्हटलं तर चालायचं नाही. तर मग बाळासाहेबांचे वंशज सावरकरांच्या पुण्यतिथीची आठवण काढून सभागृहात अभिनंदनाचं भाषण करतात का ते बघूया”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“महाराष्ट्रात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. महिलांवर अत्याचार, अन्याय वाढले आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून सगळ्या चांगल्या गोष्टींना स्थगिती दिली जाते. पण पर्याय दिला जात नाही. आपल्याला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये, महिलांमध्ये जनजागृती करावी लागणार आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरत हे आंदोलन करावं लागलं”, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं (Chandrakant Patil slams Shiv Sena).

“प्रचंड मोठ्या संख्येने लोक या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर उतरले. 355 जणांचं आतापर्यंत वृत्त आलं आहे. तर अडीच लाख लोक आंदोलनात सहभागी झाले. मी कार्यकर्त्यांचं म्हणत नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि महिला या आंदोलनात सहभागी झाले. हिंगणघाट सारख्या छोट्या शहरामध्ये अडीच हजार लोक आंदोलनात सहभागी झाले. नांदेडला अडीच हजार, पुण्यातही तीन हजार पेक्षा जास्त, तर मुंबईत सात ते आठ हजार लोक आंदोलनात सहभागी झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोट्यातल्या छोट्या तालुक्यातसुद्धा लोक रस्त्यावर उतरले आणि आंदोलनात सहभागी झाले”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

‘राज्यपालांकडे शेतकऱ्यांचे 52 हजार पत्रं सूपूर्द करणार’

“राज्यपालांची आज सहा वाजता भेटीसाठी वेळ मिळाला आहे. कोल्हापूरचे अध्यक्ष हे शाहू महाराजांचे वंशज आहेत. समरजीतसिंह राजे घाटगे यांनी अध्यक्ष झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये बारा हजार नागरिकांसोबत मोर्चा काढला. त्या लोकांच्या प्रतिसादानंतर त्यांनी लोकांना आाहन केलं होतं की तुम्ही राज्यपालांना पत्र लिहा. 52 हजार पत्रं त्यांनी गोळा केली. त्यात काहींनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिलेली आहेत. ती सर्व पत्र घेऊन समरजीत राजे मुंबईत पोहचले आहेत. राज्यपालांकडे ही सर्व पत्र सूपूर्द करणार आहोत”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

‘मुख्यमंत्री सभागृहात फक्त दहा मिनिटे थांबले आणि निघून गेले’

“महाराष्ट्राची विधानसभा कोणतेही कामकाज न होऊ देता आम्ही बंद पाडली. एवढ्या संवेदनशील विषयावर असं काही सुरु असताना मुख्यमंत्री सभागृहात फक्त दहा मिनिटे थांबले आणि निघून गेले. ते पुन्हा सभागृहात आले नाहीत. या गोष्टींच दु:ख झालं. आमचं विधानसभेचं सभागृह बंद पडणं हे लक्ष्य नाही त्याची तीव्रता लक्षात यायला हवी. आमचं म्हणणे एवढच होत की सर्व कामकाज बंद करा आणि शेतकरी कर्जमाफीवर आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करा. विधान परिषदेतही आम्ही किल्ला लढवला आणि तेथेही सभागृह बंद पडले. आगामी काळात हा संघर्ष अजून तीव्र करणार आहोत”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.