मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांना शिवाजी पार्कात जाऊन श्रद्धांजली

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनी त्यांना शिवाजी पार्कवर जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवाजी पार्कात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना देण्यासाठा राज्यभरातून शिवसैनिकांनी शिवाजी पार्ककडे कूच केली. दरम्यान शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीही बाळासाहेबांना …

मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांना शिवाजी पार्कात जाऊन श्रद्धांजली

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनी त्यांना शिवाजी पार्कवर जाऊन आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवाजी पार्कात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना देण्यासाठा राज्यभरातून शिवसैनिकांनी शिवाजी पार्ककडे कूच केली. दरम्यान शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कवर भव्य फुलांची रांगोळी काढण्यात आली आहे. या रांगोळीद्वारे एका शिवसैनिकाने आपल्या दैवताला अनोखं अभिवादन केलं.

दरम्यान, अयोध्येत राम मंदिर व्हावं अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मांडली होती. आता शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 24 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *