VIDEO : डान्स करताना स्टेजवरच 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, CM चषकातील घटना

मुंबई: भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित CM चषक स्पर्धेदरम्यान, मंचावर डान्स करताना एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या स्पर्धेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र डान्स करत असताना ही मुलगी मंचावरच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अनिशा शर्मा असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. मुंबईच्या कांदिवलीतील लालजी पाडा इथं मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला …

, VIDEO : डान्स करताना स्टेजवरच 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, CM चषकातील घटना

मुंबई: भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित CM चषक स्पर्धेदरम्यान, मंचावर डान्स करताना एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या स्पर्धेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र डान्स करत असताना ही मुलगी मंचावरच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अनिशा शर्मा असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. मुंबईच्या कांदिवलीतील लालजी पाडा इथं मंगळवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

सध्या राज्यभरात विविध ठिकाणी सीएम चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कांदिवलीतील लालजी पाडा इथंही स्थानिक भाजप नगरसेवक कमलेश यादव यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा 23 नोव्हेंबरपासून सुरु आहे. काल या स्पर्धेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी अनिसा शर्मा मंचावर नृत्य सादर करत होती.

मात्र, ती नाचत असताना  अचानक स्टेजवर कोसळली. नेमकं काय घडलं हे क्षणभर उपस्थितांना कळलं नाही. त्यानंतर उपस्थितांनी मुलीला तातडीने  जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. या मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं असं नगरसेवक कमलेश यादव म्हणाले.

मृत अनिशा शर्मा ही कांदिवली भागातच राहणारी होती. ती सातवी इयत्तेत शिकत होती. तिला डान्सची आवड होती. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *