AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?

प्रवीण परदेशींच्या जागी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Iqbal Chahal to replace Pravin Pardeshi)

धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 08, 2020 | 7:42 PM
Share

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात (Iqbal Chahal to replace BMC commissioner Praveen Pardeshi) आलं आहे. मुंबईतील कोरोनावर नियंत्रण न मिळवल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  प्रवीण परदेशींच्या जागी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Iqbal Chahal to replace BMC commissioner Praveen Pardeshi)

इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे आएएस अधिकारी आहेत. त्यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सध्या इक्बाल चहल हे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत. मात्र त्यांचा धारावीतील कामाचा अनुभव सध्या तिथला कोरोनो रोखण्यासाठी कामी येतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

इक्बाल चहल यांनी म्हाडाचे अध्यक्ष, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे.

इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट असलेले आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. चहल हे 2004 पासून मुंबई मॅरेथॉनच्या शर्यतीत भाग घेतात.

कोण आहेत इक्बाल चहल? (Who is new BMC commissioner Iqbal Chahal )

  • इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत
  • सध्या इक्बाल चहल हे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत
  • इक्बाल चहल यांनी यापूर्वी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलं आहे
  • इक्बाल हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते
  • वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे
  • केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव आणि ओसडी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
  • इक्बाल चहल हे औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही होते
  • शिवाय त्यांनी उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून काम पाहिलं
  • म्हाडाचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे
  • इक्बाल यांचं शिक्षण राजस्थानातील जोधपूर इथं झालं आहे
  • इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट अधिकारी म्हणून ओळखले जातात
  • इक्बाल चहल हे 2004 पासून सलग मुंबई मॅरोथॉनमध्ये सहभागी होतात.

प्रवीण परदेशींना हटवलं

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात (BMC commissioner Praveen Pardeshi transferred) आलं आहे. ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी