मनसैनिकांनो, तयार राहा... आता 'बेस्ट' संपात मनसेची उडी!

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप कुठलाच तोडगा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काढण्यात आला नाही. केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. मात्र, तोडग्याचा पत्ता नाही. एकीकडे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होताना दिसत नाहीत, तर दुसरीकडे बेस्ट बस रस्त्यावर धावत नसल्याने मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहेत. या संपाबाबत आतापर्यंत शांत बसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही …

मनसैनिकांनो, तयार राहा... आता 'बेस्ट' संपात मनसेची उडी!

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सहावा दिवस आहे. मात्र, अद्याप कुठलाच तोडगा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काढण्यात आला नाही. केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. मात्र, तोडग्याचा पत्ता नाही. एकीकडे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होताना दिसत नाहीत, तर दुसरीकडे बेस्ट बस रस्त्यावर धावत नसल्याने मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहेत. या संपाबाबत आतापर्यंत शांत बसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आता संबंधित प्रशासन आणि सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे आता मनसे रस्त्यावर उतरणार असल्याने या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आणखी ताकद मिळणार आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे काय म्हणाले?

“आज बेस्ट संपाचा सातवा दिवस, अजूनही संप मिटवण्यासाठी सरकारकडून हालचाल नाही. ह्या सरकारच नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. उद्यापासून नाक दाबायला सुरवात करणार! सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती, त्यांनी तयार राहावे!”, असे ट्वीट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.

संदीप देशपांडे यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार उद्यापासून मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता दिसते आहे. मनसे जर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरली, तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना मोठी ताकद मिळेल, यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच बेस्टचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘कृष्णकुंज’वर गेले होते. त्यावेळी राज ठाकरेंनीही आश्वासन दिले होते की, पक्षातर्फे सर्वोतोपरी या प्रकरणात लक्ष घालेन. दरम्यान, आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिल्याने, आता मनसे बेस्ट प्रकरणात सक्रीय होण्याची शक्यता आहे.

बेस्ट संपाचा इतिहास, आतापर्यंतचा सर्वात मोठा संप

 • 1997 मध्ये 4 दिवसाचा संप झाला होता, कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्त्वात  हा संप झाला होता.
 • 2007 मध्ये-  महाव्यवस्थापक खोब्रागडे असताना एक संप झाला होता , 3 दिवसाचा संप होता, पण यावेळी महाव्यवस्थापकांनी काही कामगारांना तडकाफडकी कामावरून काढून नवीन कामगार भरती केली होती, यावेळी कामगार नेते शरद राव अध्यक्ष होते
 • 2011 मध्ये – यावर्षी सुद्धा 3 दिवसाचा संप झाला होता.
 • 2017- मध्ये कामगार नेते शरद राव यांच्यानंतर शशांकराव यांनी धुरा घेतली. यावेळी 1 दिवसाचा संप झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं होतं.
 • 2019- यंदा सहावा दिवस संप सुरु आहे

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 

 • ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.
 • 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.
  एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
 • 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
 • कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
 • अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *