AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rains Live | मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर कायम, सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं पडली

"मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, सावधानता बाळगा" असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

Mumbai Rains Live | मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर कायम, सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं पडली
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 06, 2020 | 7:53 AM
Share

मुंबई : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीसह उत्तर कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. (Mumbai Rains Tree Fell Live Update)

“मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, सावधानता बाळगा” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पावसाचा आढावा घेत पालकमंत्र्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात असून संपूर्ण राज्यात 15 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबईत अनेक वृक्ष उन्मळले

मुंबईत कालच्या दिवसात घरं पडण्याच्या सहा तक्रारी आल्या, तर झाडं आणि फांदी पडल्याच्या 141 घटना घडल्या. तुफान पावसाने मुंबईची अक्षरशः पुरेवाट झाली. गेल्या दोन दिवसापासून सलग पाऊस कोसळत आहे.

हेही वाचा : आयुष्यात पहिल्यांदा मंत्रालय परिसर तुंबलेला पाहिला, तुफान पावसाने शरद पवारही अचंबित

भायखळा परिसरात वादळी वाऱ्यामुळे मोठा वृक्ष कोलमडून पडला. तर चर्नी रोड स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने आगीच्या ज्वाळा पेटल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कुर्ला, सायन, मरीन लाईन्स सारख्या सखल भागात पाणी साचले.

एन एस पाटकर मार्ग येथील रस्त्याच्या कडेला असलेली भिंत कोसळली. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली. विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दल व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

रायगड आणि नवी मुंबईतही सोसाट्याचा वारा होता. डी वाय पाटील स्टेडियमचे पत्रे कोसळले, तर जेएनपीटी बंदरावरील तीन क्रेन कोसळून मोठं नुकसान झालं. खांदा कॉलनी, पनवेल, नवीन पनवेल परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता.

नवी मुंबईमध्ये 25 ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. सीवूडमध्ये मॉल्सच्या काचाही निखळल्याची माहिती आहे. तर खांदेश्वर पोलीस स्टेशन इमारतीवर वृक्ष कोसळला. (Mumbai Rains Tree Fell Live Update)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली