‘घुसखोर कळवा, 5555 बक्षीस मिळवा’, मनसेच्या पोस्टरवर पोलिसांची कारवाई

चौरकोप परिसरात मनसेच्या या पोस्टरबाजीवरच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत पोस्टर हटवले आहेत.

'घुसखोर कळवा, 5555 बक्षीस मिळवा', मनसेच्या पोस्टरवर पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Mar 01, 2020 | 8:21 AM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात जोरदार मोहिम सुरु आहे. त्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करत घुसखोरांची माहिती देण्याचीही घोषणा करण्यात आली. मात्र, आता चौरकोप परिसरात मनसेच्या या पोस्टरबाजीवरच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत पोस्टर हटवले आहेत (Police action against MNS illegal banner). मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबावाखाली कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

चारकोप विधानसभा परिसरात लिंक रोड येथे मनसेकडून घुसखोरांची माहिती देण्याचं आवाहन करणारं बॅनर लावण्यात आलं होतं. यावर “घुसखोर कळवा, 5555 बक्षीस मिळवा” असं आवाहन करण्यात आलं होतं. पोलिसांनी या बॅनरवरच कारवाई करत पोस्टर हटवल्याने मनसेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी मनसेच्या कार्यालयासमोरील पोस्टर काढले आहेत. ही सर्व घटना मनसेच्या कार्यालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यावर मनसेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी पोलिसांवर राजकीय दबावाखाली पोस्टर हटवल्याचा आरोप केला. तसेच कुणाच्या दबावाखाली पोस्टर काढले? असा सवालही केला आहे.

दिनेश साळवे म्हणाले, “राज ठाकरे यांनी 23 जानेवारीला मनसेच्या अधिवेशनात आणि 9 फेब्रुवारी रोजी आझाद मैदान येथील मोर्चामध्ये एक आवाहन केलं होतं. यात त्यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हकललंच पाहिजे, असं म्हटलं. यानंतर मुंबई पोलिस या घुसखोरांवर कारवाई करत होती. हे बॅनर लावण्याचं कारण हेच होतं की वस्त्यांमध्ये जे सर्वसामान्य लोक राहतात त्यांना अशा घुसखोरांची माहिती असते. मात्र, ते पोलिसांना सांगण्यास घाबरतात. अशा लोकांनी आम्हाला माहिती सांगावी. ती माहिती अचूक असेल तर तशी माहिती सांगणाऱ्याला आम्ही 5555 रुपये बक्षीस देणार आहोत. ही माहिती आम्ही पोलिसांनाच देणार होतो.”

आम्ही कालपासून (28 फेब्रुवारी) पोस्टर लावले. या काळात आम्हाला 3 फोन आले. त्यांनी आम्हाला गांधीनगर परिसरात बांगलादेश राहत असल्याचं सांगितलं. त्यांनी त्यांची माहिती आम्हाला दिली. मात्र, 1 मार्चला आमची मॅरेथॉन स्पर्धा असल्याने आम्ही थांबलो होतो. परवा आम्ही ही माहिती पोलिसांना देणार होतो. मात्र, पोलिसांनीच हे बॅनर काढलं आहे. हा कुठल्या दबावाखाली काढला? हे पोलिसांनी सांगावं. कारण आम्ही तर घुसखोरांची माहिती देणाऱ्याला बक्षीस देणार होतो. आम्ही काही स्वतः कुणाला पकडण्यासाठी गेलो नव्हतो, असंही साळवे म्हणाले.

Police action against MNS illegal banner

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.