कसा आहे नेरुळ - खारकोपर रेल्वेमार्ग?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नेरुळ – उरण रेल्वेमार्गावरील नेरुळ – खारकोपर या पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे  लोकार्पण केलं.  रेल्वेमंत्री पियुष गोयल हे यावेळी उपस्थित होते. खारकोपर रेल्वे स्टेशन इथे हा कार्यक्रम पार पडला. सिडकोने या मार्गावरील रेल्वे स्थानक बांधले असून, रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर काही  तांत्रिक बाबीसाठी मार्ग खुला करण्यात …

कसा आहे नेरुळ - खारकोपर रेल्वेमार्ग?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नेरुळ – उरण रेल्वेमार्गावरील नेरुळ – खारकोपर या पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे  लोकार्पण केलं.  रेल्वेमंत्री पियुष गोयल हे यावेळी उपस्थित होते. खारकोपर रेल्वे स्टेशन इथे हा कार्यक्रम पार पडला. सिडकोने या मार्गावरील रेल्वे स्थानक बांधले असून, रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर काही  तांत्रिक बाबीसाठी मार्ग खुला करण्यात आला नव्हता. पण ऑक्टोबर महिन्यात याची चाचणी होऊन, हा मार्ग खुला करण्याचे निर्देश रेल्वेने दिले.

नेरुळ ते खारकोपर हा 12 किलोमीटरचा मार्ग असून, या मार्गावर पाच रेल्वे स्थानकं आहेत. नेरुळ- खारकोपर 20 फेऱ्या आणि बेलापूर  – खारकोपर 20 अशा 40 फेऱ्या या मार्गावर सध्या धावणार आहेत. गर्दीच्यावेळी सकाळी आणि सायंकाळी  या फेऱ्या होणार असून, एका लोकल फेरीमध्ये 45 मिनिटांचे अंतर असेल.

ही रेल्वे सुरु झाल्याने उलवा, बामन डोगरी, खारकोपर इथे राहणाऱ्या चाकरमान्यांना याचा फायदा होणार आहे. मुंबईहून येणाऱ्या इथल्या रहिवाशांना आतापर्यंत नेरुळ किंवा बेलापूर येथून बस किंवा रिक्षाने घरी यावं लागत होतं. मात्र आता रेल्वे सेवा सुरु झाल्याने त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

नेरुळ ते खारकोपरदरम्यानच्या तरघर  रेल्वे स्टेशनचे काम सध्या सुरु आहे. हे रेल्वे स्टेशन भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असून, दोन वर्षात ते पूर्ण होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *