'बेस्ट' संप : सेनेच्या युनियनची माघार, शशांक राव मात्र ठाम

मुंबई : ‘बेस्ट’ कर्माचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांना आज दिवसभरात प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. मात्र, दिवस संपता संपता सर्वसामान्य मुंबईकरांच्या दृष्टीने काहीशी दिलासादायक गोष्ट घडली आहे. शिवसेना पुरस्कृत बेस्ट कामगार सेनेने या संपातून माघात घेतल्याने, आज मध्यरात्रीपासूनच या संघटनेचे सुमार 11 हजार कर्मचारी कामावर रुजू होतील. तर कामगार नेते शशांक राव यांच्या बेस्ट कृती समितीने …

'बेस्ट' संप : सेनेच्या युनियनची माघार, शशांक राव मात्र ठाम

मुंबई : ‘बेस्ट’ कर्माचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांना आज दिवसभरात प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. मात्र, दिवस संपता संपता सर्वसामान्य मुंबईकरांच्या दृष्टीने काहीशी दिलासादायक गोष्ट घडली आहे. शिवसेना पुरस्कृत बेस्ट कामगार सेनेने या संपातून माघात घेतल्याने, आज मध्यरात्रीपासूनच या संघटनेचे सुमार 11 हजार कर्मचारी कामावर रुजू होतील. तर कामगार नेते शशांक राव यांच्या बेस्ट कृती समितीने मात्र संपातून माघार घेण्यास नकार देत, संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बेस्ट कृती समितीचा संप सुरुच राहणार आहे. सेनेच्या संघटनेने संपातून माघार घेतल्याने संपात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

उद्या सकाळपासून पोलिसांच्या सुरक्षेत बेस्टच्या बस सोडल्या जाणार आहेत. अंदाजे 500 बस सुरु केल्या जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

शिवसेनेने कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे – बेस्ट वर्कर्स युनियनचे प्रमुख शशांक राव

‘बेस्ट’च्या सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांनी आज संपात सहभाग घेतला होता. त्यातील शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने माघार घेतल्याने, त्यांच्या संघटनेतील सुमारे 11 हजार कामगार मध्यरात्रीपासून कामावर रुजू होणार आहेत. मात्र, बेस्ट वर्क्स युनियन या शशांक राव यांच्या संघटनेने संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला असल्याने सुमारे 19 हजार कामगार उद्याही संपावर असतील. त्यामुळे उद्याही बेस्टच्या वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळेल.

…म्हणून संपाचं हत्यार उपसलं!

लोकल वगळता मुंबईची आणखी एक लाईफ लाईन म्हणजे बेस्ट आहे. गेली अनेक वर्ष बेस्ट कर्मचारी आपल्या मागण्या प्रशासनापुढे मांडत आले आहेत. मात्र, पालिकेकडून नेहमी आश्वासनं मिळतात पण ती पूर्ण होताना दिसत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बेस्ट कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं होतं, ते ही पूर्ण केलं नाही, त्यामुळे कामगारांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे.

दोन दशकांपासून आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाची परिस्थिती नाजूक आहे. वेतनाची अनिश्चिती, कामगार सवलती आणि भत्त्यांमध्ये कपात अशा अनेक कारणांमुळे बेस्टच्या कामगारांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचारी संघटनेने हा संप पुकारला आहे, याला सेनेच्या युनियनेही पाठिंबा दिला आहे.

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

– ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.
– 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.
– एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.
– 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.
– कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.
– अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *