Avinash Jadhav tadipar notice | ...तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ, शिवसेना नगरसेवकाचा मनसेला इशारा

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस दिल्यानंतर मनसे आक्रमक झाली (Shivsena Corporator comment on Mns Criticism) आहे.

Avinash Jadhav tadipar notice | ...तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ, शिवसेना नगरसेवकाचा मनसेला इशारा

नवी मुंबई : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस दिल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. याप्रकरणानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. जर पालकमंत्र्याच्या विरोधात टीका केली, तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ, असे महेश गायकवाड म्हणाले.  (Shivsena Corporator Mahesh Gaikwad comment on Mns Criticism)

“पालकमंत्र्यानी कोल्हापूर, सांगलीचा पूर असो किंवा आता आलेले कोरोना संकट असो, अशा प्रत्येक वेळी आपला जीव धोक्यात घालून काम केल आहे. त्यांना कुणाच्या पोचपवतीची गरज नाही,” असे शिवसेना नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड म्हणाले.

“सध्या कोरोना संकट असल्याने शिवसैनिक संयम ठेवून आहेत. पण याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल आणि सहन करू असे नाही. या पुढे जर टीका केलीत तर शिवसेना स्टाईलने चोप देऊ,” असा इशारा शिवसेना नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड दिला आहे

हेही वाचा – तडीपारीची नोटीस, कोर्टात नेताना मनसैनिकांचा अविनाश जाधवांवर फुलांचा वर्षाव

दरम्यान तडीपारीची नोटीस जाहीर केल्यानंतर अविनाश जाधव यांना ठाणे कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर उद्या (3 ऑगस्ट) अविनाश जाधव यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे मनसेकडून उद्या ठाणे कोर्टाबाहेर जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. यावेळी मनसे नेत्याकडून कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मनसेकडून उद्या कोर्टात जामीनासाठी अर्ज केला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

अविनाश जाधव यांना काल (31 जुलै) ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देत गुन्हा दाखल केला. यानंतर त्यांना ठाण्यातील कापूर बावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अविनाश जाधव यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सोमवारी 3 ऑगस्टपर्यंत अविनाश जाधव यांना पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी अविनाश जाधव हे आंदोलन करत होते.  वसई पालिका आयुक्त दालनात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांतून तडीपार होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. (Shivsena Corporator Mahesh Gaikwad comment on Mns Criticism)

संबंधित बातम्या : 

MNS Avinash Jadhav | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस

अविनाश, आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया, मनसेचा आक्रमक पवित्रा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *