1000 वर्षे पुरातन ‘समाधीवाल्या बाबां’ना मिळाले अखेर घर, काय आहे प्रकरण ?

साल २०२३ मध्ये या सापळ्याला जुन्या वडनगरच्या बाहेरील इलाक्यात सरकारी निवासस्थानात खुल्या मैदानात १२ बाय १५ फूटाच्या ताडपत्री आणि कपड्याच्या तंबूत ठेवले आहे. याआधी याला इमारतीच्या पायऱ्यांखाली गॅलरीत ठेवले होते.

1000 वर्षे पुरातन ‘समाधीवाल्या बाबां’ना मिळाले अखेर घर, काय आहे प्रकरण ?
| Updated on: May 16, 2025 | 8:29 PM

गुजरातमध्ये १५ मे रोजी पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आणि 15 तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली जवळपास १००० वर्षे पुरातन हाडांच्या सापळ्याला वडनगरातील पुरातत्व अनुभव संग्रहालयात स्थलांतर करण्यात यश मिळाले. या संग्रहालयाचे उद्घाटन याच वर्षी जानेवारीत केले जाणार आहे. या १००० वर्षे पुरातन सापळ्याला ‘समाधीवाले बाबाजी’ असे म्हटले जाते.

या सापळ्याला मेहसाणा जिल्ह्यात खोदकाम करुन साल २०१९ रोजी बाहेर काढण्यात आले होते. या अस्थींना एका तात्पुरत्या तंबूत ठेवले होते. आता या सापळ्याला नवीन घर मिळाले आहे. वडनगरातील पुरातत्व अनुभव संग्रहालयाच्या क्युरेटर महिंदर सिंह सुरेला यांनी सांगितले की सापळ्यास गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान संग्रहालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. या सापळ्याला बॅरिकेट्स सह रिसेप्शन क्षेत्राच्या जवळ ग्राऊंड फ्लोअरवर ठेवले आहे. सध्या हा सापळा प्रदर्शनासाठी ठेवलेला नाही.या सापळ्याच्या संरक्षणात्मक तपासणी केल्यानंतरच त्याच्या संग्रहालयाच्या गॅलरीत स्थलांतरीत करण्याची योजना आहे.

अशा प्रकारे क्रेनचा वापर

हाडांच्या या सापळ्याला तंबूतून बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर केला गेला. खोदकामाच्या जागी काम करणाऱ्या १५ हून अधिक एएसआय आणि राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली त्यास एका ट्रेलरमधून नेण्यात आले.या प्रक्रियेला पाच तासांहून अधिक वेळ लागला. साल २०१९ मध्ये रेल्वे मार्गाच्या पलिकडील अन्नधान्याच्या गोदामाला लागून असलेल्या नापिक जमीनीत खोदकाम करुन या हाडांच्या सापळ्यास शोधून काढले होते.

समाधीच्या स्थितीत सापडले

लोथल येथील संग्रहालयात हाडांचा सापळा जतन करण्याचा विचार केला जात आहे असे गुजरातच्या पुरातत्व तसेच संग्रहालयाचे संचालक पंकज शर्मा यांनी सांगितले.  भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या ( एएसआय ) वडोदरा सर्कलचे माजी अधिक्षक पुरातत्वज्ञ अभिजित आंबेकर यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षात खोदकाम केलेल्या ९००० हून अधिक पुरावशेषात सह हा सापळा गुजरात सरकारला सोपवले. तज्ज्ञांच्या मते या हाडांचा सापळा एका अशा व्यक्तीचा आहे जी समाधी अवस्थेत बसलेली असतानाच तिला जीवंतपणे गाडले गेले असावे. ही प्रथा गुजरातमध्ये सर्वच धर्मात परिचित होती.

शोध प्रबंधात उल्लेख

‘हेरिटेज: जर्नल ऑफ मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज इन आर्किओलॉजी’मध्ये ‘वडनगर: ए थ्राइविंग कम्पोझिट टाऊन ऑफ हिस्टोरिकल टाईम्स’ शीर्षक प्रकाशित एका शोध प्रबंधात या सापळ्याचे वर्णन केले आहे. त्यात लिहीले आहे की एका खड्ड्यात क्रॉस-लेग्ड मुद्रेत बसलेला एक व्यक्ती. चांगल्या प्रकारे संरक्षित केलेला सापळा. उत्तरेकडे तोंड केलेला डोके सरळ आहे. उजवा हात कुशीत ठेवला आहे. तर डावा हात छातीच्या पातळीपर्यंतवर उचलेला आहे. संभवत:  हा हात लाकडाच्या छडीवर टेकलेला आहे. ही लाकडी छडी नष्ट झालेली आहे. या समाधी स्थितीत दफन करण्याची पद्धत ९ व्या ते १०व्या शताद्बी ईस्वीसन पासून सुरु आहे. त्यावेळी चौकोनी स्मारक स्तूपाचा उपयोग केला जात नव्हता.