मोदींनी उद्योगपतींना माफ केलेल्या कर्जातून 11 कोटी कुटुंबांना महिन्याला 20 हजार मिळाले असते: राहुल गांधी

| Updated on: Dec 31, 2020 | 11:41 AM

हाच मोदींच्या विकासाचा खरा चेहरा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. | Rahul Gandhi

मोदींनी उद्योगपतींना माफ केलेल्या कर्जातून 11 कोटी कुटुंबांना महिन्याला 20 हजार मिळाले असते: राहुल गांधी
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आतापर्यंत उद्योगपतींना माफ केलेल्या कर्जाच्या रकमेतून देशातील अनेक कुटुंबांचे भले करता आले असते, असा दावा काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. राहुल गांधी यांनी गुरुवारी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. (Rahul Gandhi take a dig at PM Narendra Modi)

नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षात उद्योगपतींचे 2378760000000 कर्ज माफ केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात एवढ्या पैशातून देशातील 11 कोटी कुटुंबांना महिन्याला 20-20 हजार रुपये देता आले असते. मात्र, तसे घडले नाही. हाच मोदींच्या विकासाचा खरा चेहरा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

‘मोदींच्या ‘असत्याग्रहा’वर बळीराजांचा विश्वास नाही’

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बुधवारच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. मोदी सरकारची आश्वासने कशी पोकळ निघालीत याची पोलखोल त्यांनी केली. मोदी सरकारने प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचंही आश्वासन दिलं होतं. त्यासाठी मला 50 दिवस द्या असं ते म्हणाले होते.

कोरोना आला तेव्हा आम्ही 21 दिवसात कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू असं ते म्हणाले होते. आमच्या भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याची कोणीही हिंमत करू शकणार नाही, असंही ते म्हणाले होते. मोदींचे हे असत्याचे प्रयोग आहेत. त्यावर देशातील शेतकरी कदापिही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

संबंधित बातम्या:

Rajeev Satav | पंतप्रधान किंवा भाजपला विचारुन राहुल गांधी परदेशात जाणार का? : राजीव सातव

मोदींच्या ‘असत्याग्रहा’वर बळीराजांचा विश्वास नाही; ‘त्या’ बैठकीपूर्वीच राहुल गांधींचं ट्विट

आम्हाला शांतता हवी, पण कोणी डिवचले तर सोडणार नाही; संरक्षणमंत्र्यांचा चीनला इशारा

(Rahul Gandhi take a dig at PM Narendra Modi)