अख्खं वऱ्हाडच अपघातात ठार, एकाच कुटुंबातील 10 जण दगावले; मध्यरात्रीच काळाचा घाला

| Updated on: May 04, 2023 | 8:15 AM

छत्तीसगडच्या कांकेर नॅशनल हायवेवर काल भीषण अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण लग्नासाठी जात होते. मात्र, ट्रकला कार धडकल्याने हा अपघात झाला.

अख्खं वऱ्हाडच अपघातात ठार, एकाच कुटुंबातील 10 जण दगावले; मध्यरात्रीच काळाचा घाला
road accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बालोद : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडावर बुधवारी मध्यरात्रीच काळाने घाला घातला. छत्तीसगडच्या बालोद येथे बुलोद कारने ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचं वरचं टपच उडून गेलं. कारच्या समोरच्या भागाचा प्रचंड चक्काचूर झाला. कारमधील 11 वऱ्हाडी या अपघातात ठार झाले. त्यात एकाच कुटुंबातील दहा जणांना समावेश होता. दुर्देवी गोष्ट म्हणजे या अपघातात एक दीड वर्षाचा मुलगाही दगावला आहे. हे सर्व लोक नातेवाईकाच्या लग्नाला जात होते. मात्र, अपघातामुळे यातील एकही जण वाचला नाही.

कांकेर नॅशनल हायेववर जगतरा येथे हा भीषण अपघात झाला. लग्नाचे वऱ्हाडी धमतरीच्या सोरम गावाहून बुलेरोने मरकाटोला येथील लग्न सोहळ्याला निघाले होते. मात्र, मध्येच अपघात झाला. या अपघातात एकूण 11 जण दगावले आहेत. त्यात दोन मुलांचा आणि पाच महिलांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

काळरात्र ठरली

बुधावारी रात्री हा अपघात झाला. या अपघातात एकूण अकराजण दगावले. हे सर्वजण लग्नासाठी जात होते. बुलेरोने ट्रकला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी जोरदार होती की गाडीतील दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सर्वांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचं ट्विट

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. बालोदच्या पुरुर आणि चारमा दरम्यान बालोदगहनजवळ लग्न सोहळ्यासाठी जात असतानाच बुलेरो आणि ट्रक दरम्यान जोरदार धडक झाली. त्यात 11 वऱ्हाडींचा मृत्यू झाला आहे, असं ट्विट करत बघेल यांनी माहिती दिली. तसेच या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

मृतांची नावे

केशव साहू (34), डोमेश ध्रुव (19), टोमिन साहू (33), संध्या साहू (24), रमा साहू (20), शैलेंद्र साहू  (22), लक्ष्मी साहू (45), धरमराज साहू (55), उषा साहू  (52), योग्यांश साहू  (3), ईशान साहू (दीड वर्ष) आदींचा या अपघातात मृत्यू झाला आहे.