Maharashtra Breaking Marathi News Live | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होण्याबाबत अजित पवार काय म्हणाले?

| Updated on: May 05, 2023 | 7:00 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होण्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
Marathi News Image Credit source: tv9 marathi

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यावर अजूनही निर्णय नाही. उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या समितीच्या बैठकीत निर्णय होणार. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन बालंबाल बचावले. हत्येच्या कटाचा संशय. उत्तर प्रदेशातील 37 जिल्ह्यातील नगर पालिकांसाठी आज मतदान होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसात बाचाबाची. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 May 2023 10:57 PM (IST)

    तामिळनाडू: पुद्दुचेरीला जाणारी बस ऑटो-रिक्षाला धडकली, 6 ठार

    तामिळनाडूहून पुद्दुचेरीला जाणाऱ्या स्टेट रोडवेजच्या बसने ऑटो-रिक्षाला धडक दिली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 04 May 2023 10:48 PM (IST)

    दिल्लीत एका दिवसात कोरोनाचे 199 नवे रुग्ण आले, 3 रुग्णांचा मृत्यू

    दिल्लीत कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने कमी होत आहेत. गेल्या 24 तासांत राजधानीत कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग दर 7.07% पर्यंत वाढला आहे.

  • 04 May 2023 10:22 PM (IST)

    अनंतनागमधील पडशाई पुलावर पोलीस पथकावर गोळीबार, एक पोलीस जखमी

    अनंतनागमधील पडशाई पुलावर दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 04 May 2023 10:03 PM (IST)

    डीआरडीओच्या शास्त्रज्ञाला अटक, पाकिस्तानला माहिती देत ​​असल्याचा आरोप

    पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसने डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाला अटक केली आहे. पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटींगच्या एका व्यक्तीने हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर शास्त्रज्ञ डीआरडीओशी संबंधित माहिती पाकिस्तानला पाठवत होता.

  • 04 May 2023 08:10 PM (IST)

    Ajit Pawar On Ncp President Post | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होण्याबाबत काय म्हणाले?

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होण्याबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया

    मी अध्यक्ष बनण्याचा प्रश्नच येत नाही - अजित पवार

    अध्यक्षपदाबाबत रस नाही - अजित पवार

    पाहा अजित पवार आणखी काय काय म्हणाले

  • 04 May 2023 08:02 PM (IST)

    Kalsubai Peak | आठ वर्षाच्या चिमुकल्याकडून 4 तासात कळसुबाई शिखर सर

    बुलडाणातील 8 वर्षांच्या मुलाकडून 4 तासात कळसुबाई शिखर सर

    तनिष्क माधव देशमुख असं मुलाचं नाव

    तनिष्क देशमुख याचं सर्वच स्तरातून कौतुक

  • 04 May 2023 07:49 PM (IST)

    Kasara Rain | कसाऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

    कसाऱ्यातील आसपासच्या भागात जोरदार पाऊस

    अवकाळी पावसाने वातावरणात गारवा

  • 04 May 2023 07:30 PM (IST)

    Amol Kolhe On Sharad Pawar Resign | खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन प्रतिक्रिया

    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया

    पवार साहेबांच्या भावना समजून घेणं महत्वाचं, खासदार कोल्हे यांची प्रतिक्रिया

    साहेब विचारांतीच निर्णय घेतील, अमोल कोल्हे यांना विश्वास

    पाहा खासदार अमोल कोल्हे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

  • 04 May 2023 07:21 PM (IST)

    Palghar Unseasonal Rain | पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, मीठ उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान

    पालघर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

    अवकाळी पावसामुळे मीठ उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान

    व्हीडिओत पाहा सविस्तर वृत्त

  • 04 May 2023 06:56 PM (IST)

    शिर्डी : पी.सिवा शंकर यांचा सामान्य दर्शन रांगेतून प्रवास

    साईबाबा संस्थानचा पदभार स्वीकारण्यापूर्वी शंकर यांचा दर्शन रांगेतून प्रवास

    शिर्डीत आल्यानंतर भाविकांची एजंटाकडून कशी लूट होते

    एजंट कसे फसवतात याबाबत सामान्य भाविक बनून घेतली माहिती

    दर्शन रांगेत भाविकांना येणाऱ्या विविध अडचणीदेखील जाणून घेतल्या

    भाविकांच्या सुकर दर्शनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन

  • 04 May 2023 06:35 PM (IST)

    पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात सायंकाळी अचानक अवकाळी पाऊस

    पावसामुळे नागरिकांसह नोकरदारांची उडाली धावपळ

    सकाळपासूनच नागरिक हे उकड्यामुळे हैराण होते

    दुपारी अचानक ढग दाटून आले आणि अवकाळी पाऊस सुरू झाला

    गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण, ऊन सावल्याचा खेळ सुरू

  • 04 May 2023 06:20 PM (IST)

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक

    आमदार-खासदार यांच्या मतदार संघातील प्रलंबित विषयावर बैठक

    विविध विकासकामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे सचिवांना आदेश

    बैठकीत विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित

  • 04 May 2023 06:00 PM (IST)

    यवतमाळ : मधमाशांचा लग्नातील लोकांवर हल्ला

    हल्ल्यात पन्नास जण गंभीर जखमी

    नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिरातील घटना

    हल्ल्यानंतर वधू-वराकडील नागरिकांची धावपळ

    अनेकांनी नाल्याच्या पाण्यात मारली उडी

    नातेवाईकांनी पळ काढल्याने अन्नाची नासाडी

  • 04 May 2023 05:58 PM (IST)

    कर्नाटकमध्ये देवेंद्र फडणवीस निवडणूक मैदानात

    बेळगावमध्ये सुरु केला झंझावती प्रचार

    पहिल्याच दिवशी काँग्रेसवर साधला निशाणा

    मराठीच्या मुद्याला दिली बगल, धार्मिक मुद्यावर खल

  • 04 May 2023 05:54 PM (IST)

    राष्ट्रवादी नेत्यांचे राजीनामा अस्त्र

    शरद पवार यांच्या आवाहनानंतरही राजीनामा

    बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी आक्रमक

    शरद पवार यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न

    80 राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

  • 04 May 2023 05:48 PM (IST)

    कोळसा उत्पादनात भारताची आघाडी

    भारताने कोळसा उत्पादनात आघाडी घेतली

    गेल्या पाच वर्षांत कोळसा उत्पादनात 23 टक्के वाढ

    उत्पादनात 893.08 दशलक्ष मेट्रीक टन वाढ

  • 04 May 2023 05:42 PM (IST)

    जयंत पाटील 'सिल्व्हर ओक'वर दाखल

    जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीला

    जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा

    शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर झाले होते भावूक

  • 04 May 2023 05:36 PM (IST)

    पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील स्फोटाचा एटीएसकडून तपास

    सहकारनगरमध्ये शनिवारी रात्री इलेक्ट्रॅानिक्स दुकानात झालेल्या स्फोटांचा एटीएसने केला तपास सुरू

    टीव्हीचा स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झाला होता

    मात्र स्फोटांत झालेल नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसचा तपास सुरू

    सोमवारी पहाटे तीन वाजता हा स्फोट झाला होता

    होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स व आणि मोबाईल शॉपी अशी दुकाने होती. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तु होत्या

    याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. एक दुचाकी पुर्ण जळाली होती

    भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाले असून यामधे एक इसम दुकानाचा मालक असल्याचे स्थानिकांकडून समजते

  • 04 May 2023 05:25 PM (IST)

    इलेक्ट्रॅानिक्स दुकानात झालेल्या स्फोटांचा एटीएसकडून तपास सुरू

    सहकारनगरमध्ये इलेक्ट्रॅानिक्स दुकानात सोमवारी पहाटे झाला होता स्फोट

    टीव्हीचा स्फोट होऊन 2 जण गंभीर जखमी झाले

    स्फोटात झालेलं नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसकडून तपास सुरू

  • 04 May 2023 05:24 PM (IST)

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्या अडचणीत वाढ

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्याविरोधात दोषारोपपत्र

    ईडीने दाखल केले 2000 पानांचं पुरवणी दोषारोपपत्र

    एक्साईज पॉलिसी प्रकरणात ईडीने पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले

  • 04 May 2023 05:12 PM (IST)

    बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला ब्रेक

    पटणा हायकोर्टाने तात्काळ प्रभावाने थांबवली प्रक्रिया

    डाटा सुरक्षित ठेवण्याचे दिले निर्देश

    3 जुलै रोजी होईल पुढील सुनावणी

    जातनिहाय जनगणनेवर मोठा निर्णय

  • 04 May 2023 05:04 PM (IST)

    विकासाची गाडी फक्त मोदींसोबतच पुढे जाऊ शकतात - देवेंद्र फडणवीस

    छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारं सरकार द्यायचे की टिपू सुलतान की जय म्हणणारं सरकार द्यायचं

    हे तुम्हाला ठरवायचं आहे

    कर्नाटकात आज अनेक विकास काम झाली मात्र एक पैशाची दलाली कोणाला द्यावी लागली नाही

    लॉकडाउनच्या काळात नरेंद्र मोदीच भारतीयांच्या पाठिशी उभे राहिले

    मागच्या वेळी भाजपला थोड्या जागा कमी पडल्या तर बाकीच्यांची सर्कस सुरू झाली

    आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला

    बजरंग दलाने भारत माता की जय म्हटलं म्हणून त्यांना बंदी घालता का?

    भारत तुम्हारे तुकडे होंगे हजार असं म्हणणाऱ्या दिल्ली युनिव्हर्सिटीतील लोकांचं राहुल गांधी सांत्वन करतात

    इतके हे नालायक लोक आहेत

    त्यांना अजूनही मोघलांबद्दल कळवळ आहे, त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे का?

  • 04 May 2023 05:02 PM (IST)

    Gold Silver : जळगाव सराफा बाजारात सोन्याची उसळी

    जळगावात सोन्याचे दर प्रति तोळा 63 हजार 500 रुपयांवर

    आंतरराष्ट्रीय बाजाराचा मोठा परिणाम

    सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी

  • 04 May 2023 04:59 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल

    रत्नागिरी दौऱ्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात दाखल

    उद्या राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन

    उद्या पुण्यातून राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यासाठी रवाना होणार

  • 04 May 2023 04:56 PM (IST)

    Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

    इंधनाच्या महागाईचे दिवस संपले

    पेट्रोल-डिझेलमध्ये लवकरच दोन अंकी कपात

    इतकी होणार लिटरमागे बचत

    केंद्र सरकार खेळणार इंधन कार्ड, वाचा सविस्तर 

  • 04 May 2023 04:49 PM (IST)

    मंगळवेढा मला नवीन नाही, हा गरीब लोकांचा परिसर - नारायण राणे

    गेली 55 वर्षं मी राजकारणात आहे

    माणूस म्हणून सगळे जगतात, पण माणूस म्हणून रहायचे कसे?

    सुखी कसे राहायचे हे समजले पाहिजे

    अमेरिका, ब्रिटनच्या तुलनेत आपले दरडोई उत्पन्न कमी

    आपल्या देशात 2 लाखात मानव जगतो

    मंगळवेढा परिसरात उद्योग वाढीसाठी क्लस्टरची मागणी आहे

    क्लस्टर हे येथील तरुण तरुणीसाठी

    येथील लोकांनी स्वतः राज्याचे आणि देशाचे उत्पन्न वाढवून जीडीपी वाढवावा

  • 04 May 2023 04:42 PM (IST)

    शरद पवार यांचा निर्णय वैयक्तिक - नारायण राणे

    55 वर्षांपासून मी राजकारणात

    अजित पवार सीमी रेषेवर

    उद्धव ठाकरे अडीच वर्षात फक्त अडीच तास मंत्रालयात

  • 04 May 2023 04:39 PM (IST)

    संजय राऊत पक्ष तोडण्यासाठी काम करतात - संजय शिरसाट

    यंत्रणाचे दबाव ठेवून राजकारण चालत नसतं

    शिवसेना संजय राऊतांनी संपवली

    राष्ट्रवादी संपवण्याचा प्रयत्न राऊतांचा आहे

    संजय राऊतांनी आपला पक्ष बघावा

    दुसऱ्यांचं वाकून पाहण्याची संजय राऊतांना सवय

    त्यामुळे अजित पवार आणि नाना पटोलेनी झापलं आहे

    संजय राऊतांनी इतर पक्षामध्ये लुडबुड करू नये

  • 04 May 2023 04:38 PM (IST)

    राष्ट्रवादीमध्ये अनेक दिवसांपासून अंतर्गत कलह - संजय शिरसाट

    शरद पवारांचा निर्णय विचारअंती घेतलेला आहे

    भाकरी फिरवायची सुरूवात पवारांनी स्वतःपासून केली

    आली तर पूर्ण राष्ट्रवादी भाजपासोबत येईल असं वाटतं एखादा गट येईल असं वाटतं नाही

    महाविकास आघाडी काँमन मिनिमम प्रोगामवर झाली होती

    आमच्या विचारांशी राष्ट्रवादीनं जुळवण घेतलं तर आम्ही स्वागत करू

  • 04 May 2023 04:27 PM (IST)

    कोण कुणाला सल्ला देतो हे कळत नाही - श्रीकांत भारतीय

    उद्धव ठाकरेंचा सल्ला पवारांना लागतो की नाही हे बघावे लागेल

    उद्धव ठाकरे कधी सरळ बोलले नाही ते टोलाच लगावतात

    ज्याच्याकडे जे आहे ते तो देतो

    उद्धव ठाकरे यांच्याकडे शिव्याच आहे, त्यामुळे ते तेच देतात

    उद्धव ठाकरेंनी हुकूमशहा म्हणावे एवढे त्यांचे मॉरल आहे का?

    त्यांचा पक्षच हुकूमशाहीवर चालतो

    उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संजय राऊत यांचा भोंगा ऐकला तर कळेल की त्यांची वज्रमुठ केव्हाच सुटत चाललीय

    अजित पवारांनी स्वत:च स्पष्ट केलंय की मी आयुष्यभर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राहणार

    तर मी त्यावर बोलण्याचा प्रश्नच नाही

  • 04 May 2023 04:00 PM (IST)

    पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी

    पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी

    पुण्यात नोकर भरतीसाठी जाणाऱ्या एका तरुणाला दहावीचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर

    60 हजार रुपये घेऊन देत होता बनावट प्रमाणपत्र

    दहावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेट बरोबर मार्कशीट आणि स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट देत होता

    संदीप कांबळे असे या आरोपीचे नाव आहे

    आरोपी संदीपने अनेक लोकांना पैसे घेऊन फसविल्याचे चौकशीत उघड

    राज्यातील 35 तरुणांना फसवल्याचा पोलिसांना संशय

  • 04 May 2023 03:55 PM (IST)

    पुणे पालिकेतील 2,300  कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

    महाराष्ट्र दिनाला पुणे पालिकेतील 2,300 कर्मचारी अनुपस्थित

    अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे पालिका आयुक्तांचे आदेश

    पुणे पालिकेतील 2, 300  कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

    एकुण 2500 अधिकारी आणि कर्माचारी महापालिकेत कार्यरत

  • 04 May 2023 03:37 PM (IST)

    पुण्यात 8 मे रोजी वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा

    प्रकाश आंबेडकरांची 8 मे रोजी पिंपरी चिंचवडमध्ये सभा

    पिंपरी चिंचवडमधील भीमसृष्टीवर प्रकाश आंबेडकरांची सभा

    वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सभा

  • 04 May 2023 03:20 PM (IST)

    मुंबई उच्च न्यायालयानं राणा कपूरांचा जामीन अर्ज फेटाळला

    600 कोटींचं कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण

    येस बँकेचे संस्थापक राणा कपूरांचा जामीन अर्ज फेटाळला

    मुंबई उच्च न्यायालयानं राणा कपूरांचा जामीन अर्ज फेटाळला

    राणा कपूरांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

  • 04 May 2023 03:01 PM (IST)

    शरद पवार कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वाय.बी.सेंटर बाहेर

    शरद पवार कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी बाहेर

    पवार यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

    शरद पवार यांनी राजीनामाचा निर्णय मागे घ्यावा, यावर कार्यकर्ते ठाम

  • 04 May 2023 02:40 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा शुभारंभ पुण्यातून

    उद्या सकाळी पुणे मनसेकडून राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाणार,

    ढोल ताश्यांचा गजरात राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा शुभारंभ होणार,

    राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याची पुणे मनसेकडून जय्यत तयारी

  • 04 May 2023 02:30 PM (IST)

    नाशिक | नाशिक शहरात अवकाळी पावसाची हजेरी

    अचानक आलेल्या पावसाने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची झाली धावपळ

    शहरातील पंचवटी, शालिमार, जुने नाशिक भागात पावसाची हजेरी

  • 04 May 2023 02:22 PM (IST)

    अहमदनगर | पत्नीला संपवून पतीने स्वतःचं देखील आयुष्य संपवलं

    नगर शहरातील स्टेशन रोडवरील शिवनेरी चौक परिसरातील घटना

    डोक्यात लोखंडी झाऱ्याने मारहाण करून संपवला पत्नीचा जीव... मृतदेह टाकला बाथरूममध्ये

    पत्नीला संपवून पतीने स्वतःचं देखील आयुष्य संपवलं

    कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल मात्र घटनेचे कारण अस्पष्ट

  • 04 May 2023 02:15 PM (IST)

    शिर्डी | शिर्डीचं होणार सुशोभीकरण; 52 कोटींचा विकास आराखडा मंजूर...

    शिर्डीचा चेहरा मोहरा बदलणार...

    52 कोटींचा विकास आराखडा मंजूर...

    शिर्डी शहरातील मंदिर परिक्रमामार्गाचे होणार सुशोभीकरण...

    मंदिरासमोरील नगर मनमाड महामार्गाच्या दोन्ही बाजूला हजारो झाडे लावली जाणार...

    भक्तांना बसण्याच्या व्यवस्थेसह होणार सौंदर्यीकरण...

    राज्य सरकारने मंजूर केला विशेष निधी...

    विकास आराखडा आज साईचरणी अर्पण केला जाणार...

    महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील चार वाजता साईमंदिरात अर्पण करणार आराखडा...

    पुढच्या एक ते दिड वर्षात बदलणार शिर्डीचा चेहरामोहरा...

  • 04 May 2023 01:56 PM (IST)

    मोदींचा पराभव नाही तर वृत्तीचा पराभव करायचा आहे - उद्धव ठाकरे

    मुंबई : बजरंग बली की जय म्हणून मोदी सांगत असतील तर आता काय करणार ?

    बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता

    जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा - उद्धव ठाकरे

    मराठी माणसाने एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे

  • 04 May 2023 01:53 PM (IST)

    शरद पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

    मुंबई : मी मुख्यमंत्री काय केलं हे जगजाहीर आहे

    प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या घरातील एक सदस्य वाटतोय

    शरद पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

    शरद पवार यांनी आत्मचरित्रात उद्धव ठाकरे हे मंत्रालयात गेले नाही हे पटले नाही असं म्हंटलं आहे

    एनसीपीत काहीही घडलं तरी महाविकास आघाडीला तडा जाणार नाही

  • 04 May 2023 01:47 PM (IST)

    खासदारकी रद्द करण्यावरून सुप्रीम कोर्टाने झापले

    नवी दिल्ली : दोन वर्षाची शिक्षा झाल्यावर खासदारकी रद्द होण्याच्या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

    केरळमधील आभा मुरलीधरन नावाच्या महिलेने दाखल केली होती याचिका

    याचीकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    तुम्ही कोण आहात ? तुमच सदस्यत्व रद्द झाल आहे का ? सुप्रीम कोर्टाची विचारणा

    राहुल गांधी यांच्या बाबत मागणी करणारी याचिका दाखल होती

  • 04 May 2023 01:42 PM (IST)

    कुस्तीपटूंच प्रकरण अखेर हायकोर्टात

    नवी दिल्ली : पोस्को कायद्या अंतर्गत दाखल खटल्यामध्ये महिला कुस्तीपटूंचे जबाब नोंदवा, मॅजिस्ट्रेट समोर जबाब नोंदवले जावेत

    यापुढे या प्रकरणात हायकोर्ट लक्ष घालेल : सर्वोच्च न्यायालय

    आत्तापर्यंत खेळाडूंचे जबाब का नोंदवण्यात आले नाही सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

    हरीश साळवे यांचा ब्रजभूषण शरण सिंह यांच्या वतीने युक्तीवाद केला

  • 04 May 2023 01:29 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाचा केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलासा

    नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या खर्चाबाबत आम्ही लक्ष घालणार नाही

    आयोग EVM मशीन खरेदीवर जास्त खर्च करत - याचिका

    देशात निवडणूक प्रक्रिया मोठी आहे, आयोग कसा खर्च करत हा त्यांचा प्रश्न आहे - सुप्रीम कोर्ट

  • 04 May 2023 01:15 PM (IST)

    माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या बनावट सचिवा ने पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला घातला लाखो रुपयांचा गंडा.

    पुणे : गगन केशव रांहाडगळे असे माजी सहकारमंत्र्याच्या बनावट स्वीय नाव..

    आरोपी गगन हा पुण्यातील येरवडा परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध नागरिकाला गंडा घातला आहे.

    घरावर असलेल्या एका खाजगी बँकेची कर्जाची कोट्यावधी रुपयांची रक्कम मंत्र्याच्या मार्फत माफ करून देतो अशी थाप मारून तब्बल 59 लाख रुपये उकळले

    थेट माजी मंत्र्याच्या नावाने वृद्धाना लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणात येरवडा पोलिसात ३ जणांवर गुन्हा दाखल

  • 04 May 2023 01:06 PM (IST)

    किशतवाड मध्ये भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात

    जम्मू : 3 जण होते हेलिकॉप्टरमध्ये, 1 जणाचा मृत्यू

    अपघातग्रस्त भागात लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू

  • 04 May 2023 01:02 PM (IST)

    2018 च्या निवडणुकीची उणीव आता भरून काढू - देवेंद्र फडणवीस

    - बेळगाव येथे प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केलीय.

    - मागच्या 2018 च्या निवडणुकीमध्ये थोडेसे कमी पडले होते. मात्र, आता ती उणीव भरून काढू, असेही फडणवीस म्हणाले.

    - देशाचा पैसा देशामध्ये परत आणण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं.

    - एक काळ असा होता आमचे मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते. एखाद्या कार्यक्रमात ते जायचे त्यावेळी ते फोटोमध्ये कुठे उभे आहेत हेच माहिती होत नसे.

    - ते पाठीमागे उभे असायचे.

    - रामाच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणारे एकीकडे आणि दुसरीकडे मंदिर वही बनायेंगे सांगत खऱ्या अर्थाने मंदिर बांधणारे मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी दुसरीकडे फडणवीस म्हणाले.

  • 04 May 2023 12:33 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील 54 पाणी प्रकल्पांमध्ये 44 टक्के पाणीसाठा

    - अमरावती जिल्ह्यात मोठे माध्यम आणि लघु असे एकूण 54 प्रकल्पामध्ये केवळ 34 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

    - यामुळे जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे.

    - नांदेड जिल्ह्यात वातावरणातील बदल झाला असून येथे थंडीत वाढ झाली आहे.

    - राज्यसरकारच्या नव्या वाळू धोरणानुसार अमरावतीमध्ये 14 ठिकाणी 99 वाळू डेपो सुरू होणार आहेत.

  • 04 May 2023 12:27 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांना बेळगावमध्ये काळे झेंडे दाखवले

    - कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी बेळगाव येथे गेलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यात आले आहेत.

    - महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून हे काळे झेंडे दाखविण्यात आले आहेत.

    - शिवसेने खासदार संजय राऊत यांनी प्रचारादरम्यान शिंदे, फडणवीस यांना काळे झेंडे दाखवा असे आवाहन केले होते.

    - त्यामुळे प्रचारासाठी गेलेल्या फडणवीस यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले आहेत.

  • 04 May 2023 12:15 PM (IST)

    ठाकरे यांच्या भेटीला बिहारचे सभापती ठाकूर, मातोश्री येथे होणार भेट

    बिहार विधानपरिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.

    आज दुपारी 1 वाजता मातोश्री निवासस्थानी ही भेट होणार आहे.

    यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आमदार कपिल पाटील सोबत असणार आहेत.

    या भेटींनंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे.

  • 04 May 2023 11:58 AM (IST)

    राऊत यांचे आधीचे लेख वाचल्यास लोक चपला मारतील, नितेश राणे यांची टीका

    सामनाच्या अग्रलेखातून आग लावायचे काम केले-  नितेश राणे

    राऊतांची चमडेगिरीमध्ये पिएचडी, नितेश राणेंचा हल्लाबोल

    सुप्रिया सुळे आणि अजित दादांमध्ये संजय राऊतांनी आग लावली

  • 04 May 2023 11:41 AM (IST)

    संजय राऊत यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांची टिका

    संजय राउतांनी काँग्रेसची दलाली सोडावी- देवेंद्र फडणवीस

    मराठी भषिकांच्या मागे भाजप उभा आहे- देवेंद्र फडणवीस

  • 04 May 2023 11:35 AM (IST)

    राहूल गांधी आणि एम. के. स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन

    शरद पवार यांनी राजिनामा का दिला याची विचारपुस करण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांचे फोन

    राहूल गांधी यांनी सुप्रिया सुळेंकडे मांडले मत

    अनेक बड्या नेत्यांकडून शरद पवारांची मनधरणी

  • 04 May 2023 11:29 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी कोणाच्याही नावाची चर्चा नाही- अनिल देशमुख

    शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहावे हीच आमची ईच्छा- अनिल देशमुख

    आमच्या प्रयत्नांना यश येईल अशी आशा आहे- अनिल देशमुख

  • 04 May 2023 11:22 AM (IST)

    शरद पवार आजही वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये कार्यकर्त्यांना भेटणार

    राजीनाम्यानंतरही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरूच

    संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत

    कार्यकर्त्यांकडून शरद पवारांची मनधरणी सुरू

  • 04 May 2023 11:17 AM (IST)

    पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाची छापेमारी, सकाळपासून धाडसत्र सुरु

    तीन बांधकाल व्यावसायीकांच्या निवासस्थानी आयकर विभागाची छापेमारी

    आर्थिक अनियमीतते प्रकरणी छापेमारी झाल्याचा अंदाज

  • 04 May 2023 11:15 AM (IST)

    Multibagger Stock : या पाच स्टॉकची धमाल

    गुंतवणूकदारांना मिळाला मोठा परतावा

    गेल्या काही दिवसांपासून अप्पर सर्किट

    तर काहींनी उसळी घेतल्यानंतर घेतली माघार

    आयटी, इलेक्ट्रिक टेक्सटाईलसह या क्षेत्रातील स्टॉक

    गुंतवणूकदार काही दिवसांतच मालामाल, वाचा सविस्तर 

  • 04 May 2023 11:11 AM (IST)

    कोरोना काळात वर्क फ्रॉम होम ही केंद्राची सुचना होती- संजय राऊत

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात जात नसायचे या मुद्द्यावर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

    शरद पवार यांच्या पुस्तकावर उद्धव ठाकरे लवकरच प्रतिक्रीया देतील - संजय राऊत

  • 04 May 2023 10:46 AM (IST)

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार सोडून कोणाचही नाव नाही - अनिल देशमुख

    - अध्यक्ष म्हणून शरद पवारांचच नाव

    - अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, कोणाच्याही नावाची चर्चा नाही

    - 7 ते 8 लोकांच्या समितीची उद्या बैठक होईल

  • 04 May 2023 10:32 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत उद्या होणार निर्णय

    अध्यक्षपद निवड समितीची उद्या बैठक होणार

    या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता

  • 04 May 2023 10:30 AM (IST)

    मुंबई : पवारांच्या पुस्तकातील मुद्यांना ठाकरे सडेतोड उत्तर देणार - संजय राऊत

    लोक माझे सांगाती या पुस्तकात उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीबाबत करण्यात आला होता उल्लेख

    पवारांकडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका

    त्यावर ठाकरे योग्य वेळी उत्तर देतील, संजय राऊत यांनी केले स्पष्ट

    उद्धव ठाकरे नियमितपणे मंत्रालयात जात होते

  • 04 May 2023 10:24 AM (IST)

    नागपूर : अवकाळी पावसाचा वीट भट्ट्यांना मोठा फटका

    - गेल्या तीन चार दिवसांतल्या सततच्या पावसामुळे कच्च्या विटांची झाली माती

    - कच्च्या विटांची पावसामुळे माती झाल्याने २५ लाख रुपयांचे नुकसान

    - नागपूरातील पुनापूर, पारडी भागात ५० ते ६० वीटभट्ट्या

    - वीटभट्ट्यांवर १५० मजूर काम करतात, सततच्या पावसामुळे मुजरांचा रोजगार बुडाला

    - पाणी वीटभट्टीत शिरल्याने कच्च्या विटा आणि मातीही वाहून गेली

    - नुकसान भरपाई मिळण्याची केली मागणी

  • 04 May 2023 10:17 AM (IST)

    Gold Silver Price Today : सोने-चांदी पुन्हा सुसाट

    सोने-चांदीच्या किंमतींनी घेतली उसळी

    अमेरिकेच्या या धोरणाचा झाला परिणाम

    19 एप्रिलपासून दरवाढीला ब्रेक

    3 मेपासून पुन्हा किंमतींमध्ये वाढ

    सोने-चांदीचा भाव एका मिस्ड कॉलवर जाणून घ्या, वाचा बातमी 

  • 04 May 2023 10:14 AM (IST)

    सांगली : ट्रॅव्हल्स व कारचा भीषण अपघात, 4 जण ठार

    जिल्ह्यातील विटा नेवरी रोडवर आज सकाळी ट्रॅव्हल्स व कारचा भीषण अपघात झाला आहे. यात चारजण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

    आज सकाळी हा अपघात घडला आहे.

    विट्याहून नेवरीकडे निघालेल्या गितांजली ट्रॅव्हल्सला कारची धडक बसून अपघात हा झाला.

    यात तीन पुरुष व एक महिला ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

    यानंतर अपघातस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

  • 04 May 2023 10:06 AM (IST)

    पुण्यातील सिंध सोसायटीत आयकर विभागाची छापेमारी

    - सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी,

    - हे तिन्ही बांधकाम व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती,

    - पहाटेपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु,

    - या बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती

  • 04 May 2023 09:56 AM (IST)

    दिल्लीत जंतर-मंतर परिसर निर्मनुष्य

    जंतर-मंतर परिसर निर्मनुष्य

    पोलिसांचा प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त जंतर-मंतर परिसरात

    बॅरिकेटिंग करून पोलिसांनी सर्व रस्ते केले बंद

    माध्यमांच्या ओबी व्हन्स आणि गाड्याही एक किलोमीटर लांब हलवल्या

    आंदोलन परिसरात कलम 144 लागू

    मध्यरात्रीच्या राड्यानंतर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर

  • 04 May 2023 09:48 AM (IST)

    जगभरात मंदीचे संकट

    अमेरिकेतील तीन बँका दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्याचा परिणाम जगभर होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंदीचे संकट घोंगावत आहे. आता भारतात काय परिस्थिती असणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे....सविस्तर वाचा

  • 04 May 2023 09:39 AM (IST)

    नाशिकमध्ये अपघात

    नाशिक द्वारका परिसरात उड्डाणपुलावर भीषण अपघात

    मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक आणि पीक अपमध्ये धडक

    अपघातात 2 जण गंभीर जखमी

    अपघातामुळे नाशिक उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी

  • 04 May 2023 09:32 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात पोस्टर

    तुमसर शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात बॅनरबाजी करण्यात करण्यात आली आहे. "वस्ताद.. कधीही कुस्ती सोडत नसतो, तो आणखी नव्या जोमाने पैलवानांची भावी पिढी घडवत असतो. साहेब, तुम्ही आमच्या पाठिशी होता, आहात आणि कायम राहाल...साहेब,आपला निर्णय मागे घ्या...

    शरद पवार यांना आगळेवेगळे आवाहन

    भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात पहिल्यांदाच लागले शरद पवार यांचे बॅनर.

  • 04 May 2023 09:21 AM (IST)

    सिंध सोसायटीत छापेमारी

    पुण्यातील सिंध सोसायटीत आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे. हे तिन्ही बांधकाम व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी पहाटेपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे....वाचा सविस्तर

  • 04 May 2023 09:09 AM (IST)

    दुचाकीचा अपघात

    बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात लोखंडा फाट्याजवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. अपघात इतका भीषण होता की या अपघातात दुचाकी जळून खाक झाली आहे.

  • 04 May 2023 09:02 AM (IST)

    अतिक्रमणविरोधी कारवाई

    पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाई

    एक लाख चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम काढली

    शहरात गेल्या तीन दिवसापासून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई

  • 04 May 2023 08:57 AM (IST)

    अमरावती | राज्य सरकारच्या नव्या वाळू धोरणानुसार अमरावती जिल्ह्यात 14 ठिकाणी नव्याने सुरू होणार वाळू डेपो

    14 पैकी 8 तालुक्यात 44 वाळूंचे घाट

    वाळू डेपोमधून सहाशे रुपये ब्रासने मिळणार सर्वसामान्यांना वाळू

    अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी सरकारने आणली नवीन नियमावली

    वाळू वाहतुकीचे दर जिल्हा प्रशासन तयार करणार

  • 04 May 2023 08:45 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज नियोजित असलेली सुनावणी होण्याची शक्यता कमी

    काल रात्री उशिरापर्यंत आज होणाऱ्या सुनावणींच्या यादीत या याचिकेचा समावेश नाही

    ही सुनावणी आता उन्हाळी सुट्टीनंतरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

    स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांना पावसाळ्यानंतर म्हणजे किमान ॲाक्टोबर महिन्याचा मुहूर्त उजाडेल

    अशी शक्यता वर्तवली जात आहे

  • 04 May 2023 08:41 AM (IST)

    Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाचे 'पिच्छे मुड'!

    जागतिक बाजारात क्रूड ऑईलची घसरगुंडी

    परभणी, नांदेड, औरंगाबादमध्ये पेट्रोल-डिझेल महागले

    पेट्रोलियम कंपन्यांसाठी सध्या अच्छे दिन

    प्रति लिटर इतक्या रुपयांचा कमावित आहे नफा

    आज तुमच्या शहरातील इंधनाचा भाव काय, वाचा सविस्तर 

  • 04 May 2023 08:33 AM (IST)

    नाशिक | शहरातील शालिमार परिसरात सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम

    अतिक्रमण विभागाची पहाटेपासून कारवाई सुरू

    शिवसेना कार्यालयाशेजारी असलेले अनधिकृत गाळे हटविण्याचे काम सुरू

    पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

    अनेक वर्षांपासून तक्रारी होऊन देखील हटवले जात नव्हते अनधिकृत दुकानं

  • 04 May 2023 08:27 AM (IST)

    पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाची छापेमारी

    काही बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई झाल्याची माहिती

    सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी

  • 04 May 2023 08:17 AM (IST)

    नाशिक | आता घनकचरा केंद्रात प्लॅस्टिकपासून तयार होणार इंधन

    वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात पाच लिटर प्रतिदीन क्षमतेच्या यंत्राची करण्यात आली उभारणी

    मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले दोन्ही संयंत्र कार्यान्वित

    बॅलेस्टिक सेपरेटर आणि प्लॅस्टिक टू फ्युइल असे दोन संयंत्र कार्यान्वित

  • 04 May 2023 08:09 AM (IST)

    नाशिक | 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी

    सकल हिंदू महिला समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन

    जिल्ह्यातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

  • 04 May 2023 08:09 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील 54 पाणी प्रकल्पात 44.19% जलसाठा.

    अमरावती जिल्ह्यातील 54 पाणी प्रकल्पात 44.19% जलसाठा.

    उन्हाळ्यात प्रकल्पातील जलसाठांवर जिल्ह्याची मदार...

    अमरावती जिल्ह्यात मोठे मध्यम आणि लघु असे एकूण 54 पाणी प्रकल्प..

    पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अप्पर वर्धा धरणात 47.4% जलसाठा..

  • 04 May 2023 08:08 AM (IST)

    नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

    -सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकानेच घेतली लाच

    -संशयित सागर डगळे यांना सात हजार रुपयांची लाच घेताना घेण्यात आले ताब्यात

    -नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

    -वाहतूक आणि जेवण खर्चासाठी लाच मागितल्याची प्राथमिक माहिती

  • 04 May 2023 08:08 AM (IST)

    आता घनकचरा केंद्रात प्लॅस्टिकपासून तयार होणार इंधन

    नाशिक ब्रेकिंग

    -आता घनकचरा केंद्रात प्लॅस्टिकपासून तयार होणार इंधन

    -वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात पाच लिटर प्रतिदीन क्षमतेच्या यंत्राची करण्यात आली उभारणी

    -मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले दोन्ही संयंत्र कार्यान्वित

    -बॅलेस्टिक सेपरेटर आणि प्लॅस्टिक टू फ्युइल असे दोन संयंत्र कार्यान्वित

  • 04 May 2023 08:07 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगरात झोपेच्या गोळ्या आणि सर्दी खोकल्याच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर..

    ब्रेकिंग छत्रपती संभाजी नगर :-

    छत्रपती संभाजी नगरात झोपेच्या गोळ्या आणि सर्दी खोकल्याच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर..

    मेडिकल मधील औषधींचा वापर नशेसाठी सर्रासपणे करत असल्याचे आले समोर..

    15 हजारांच्या सिरपच्या बाटल्या आणि 3 हजारांच्या गोळ्या जप्त..

    खोकल्याची औषधें वापरले जात होते नशेचे साधन म्हणून..

    डॉक्टरांच्या बिलाशिवाय आणि सल्ल्याशिवाय केली जात होती औषधांची विक्री..

  • 04 May 2023 07:55 AM (IST)

    मावळ तालुक्यातील माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

    भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली नियुक्ती

    बाळा भेगडे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणीमध्ये 16 उपाध्यक्ष असणार

    प्रदेश कार्यकारिणीत पिंपरी चिंचवडला देखील झुकत माप, मात्र जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याने नाराजी

  • 04 May 2023 07:50 AM (IST)

    सुप्रिया सुळे यांना राहुल गांधी आणि एमके स्टॅलिन यांचा फोन

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांना फोन

    राजकीय घडामोडींवर राहुल गांधी, एमके स्टॅलिन यांची सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा

  • 04 May 2023 07:28 AM (IST)

    भाजपच्या नव्या टीममध्ये पुण्यातून राजेश पांडे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश

    पुणे शहर भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांना उपाध्यक्षपदी बढती,

    माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची पुन्हा एकदा सरचिटणीस पदावर नियुक्ती

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर

    येत्या काही दिवसात पुण्यासाठी नवीन शहराध्यक्षही जाहीर होण्याची शक्यता

  • 04 May 2023 07:07 AM (IST)

    उत्तर प्रदेशातील महापालिका निवडणुकीला मतदान सुरू

    पहिल्या टप्प्यात 37 जिल्ह्यात होणार मतदान

    एकूण 44,226 उमेदवार मैदानात

    भाजप, सपा आणि बसपामध्ये होणार लढत

  • 04 May 2023 07:05 AM (IST)

    शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे आनंद सागरमधील आध्यात्मिक केंद्र आजपासून भक्तांसाठी खुले

    संत गजानन भक्तांना अनेक वर्षांपासून होती आनंद सागर अध्यात्मिक केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा

    दररोज सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहील आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्र

  • 04 May 2023 07:03 AM (IST)

    रत्नागिरीत राज ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 मे रोजी रत्नागिरीत सभा होणार आहे.

    राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

    मुंबईतील कार्यकर्ते रत्नागिरीत पोहोचले असून मनसे अध्यक्षांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर लावत आहेत.

  • 04 May 2023 07:00 AM (IST)

    सचिन तेंडुलकर मध्यप्रदेशात मुलांसाठी शाळा बांधणार, शेकडो मुलांना मिळणार शिक्षण

    भारतरत्न सचिन तेंडुलकर मध्य प्रदेश येथील संदाळपूर गावात शाळा बांधणार आहे

    सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने या गावातील आणि आसपासच्या 2300 मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - May 04,2023 6:58 AM

Follow us
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.