पुणे शहरात आयकर विभागाचा रडारवर कोण, सुरु झाले छापासत्र

income tax raids : राज्यात आयकर विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई नाशिकमध्ये केली होती.या कारवाईत हजारो कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड झाले होते. यानंतर आता पुणेमध्ये कारवाई सुरु झाली आहे. बांधकाम व्यावसायिकांवर ही कारवाई होत आहे.

पुणे शहरात आयकर विभागाचा रडारवर कोण, सुरु झाले छापासत्र
Pune Income Tax Raid
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 9:52 AM

योगेश बोरसे, पुणे : पुणे शहरात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आली आहे. सकाळपासून कारवाई सुरु झाली आहे. या कारवाईत बांधकाम व्यावसायिकांना रडारवर होते. पुणे येथील अधिकाऱ्यांचे पथक ही कारवाई करत आहे. यामध्ये किती बेहिशोबी रक्कम उघड होणार? याकडे लक्ष लागले आहे. पुणे परिसरातील पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी पोहचले आहेत आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे.

पुण्यात कुठे सुरु आहेत छापे

पुण्यातील सिंध सोसायटीत आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे. हे तिन्ही बांधकाम व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी पहाटेपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

नुकतीच नाशिकमध्ये झाली होती मोठी कारवाई

नाशिकमध्ये राज्यातील सर्वात मोठी कारवाई नुकतीच झाली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता उघड झाली आहे. राज्यातील बडे अधिकारी, व्यापारी आणि राजकीय नेते यांची यामध्ये गुंतवणूक आहे. जवळपास दीड हजार अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी केली संबंधित बिल्डरांकडे गुंतवणूक केली आहे. आयकर विभागाच्या छाप्यात बिल्डर्सचे 3333 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड झाले आहे. या कारवाईचे धागेदोरे पुणे शहरातही होते. त्यामुळे आता सुरु असलेली कारवाई आणि नाशिकमधील कारवाई याचा संबंध आहे का? यासंदर्भात चर्चा सुरु आहे.

नाशिकमध्ये तब्बल सहा दिवस कारवाई

नाशिकमध्ये तब्बल सहा दिवस कारवाई सुरु होती. बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, निवासस्थाने आणि इतर ठिकाणी झाडाझडती करण्यात येत होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा दिवसांत तब्बल 3333 कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघड केल्यानंतर आता दुसरा टप्पा सुरु होणार आहे. यामध्ये ज्या लोकांना बांधकाम व्यावसायिकांकडे गुंतवणूक केली, ते रडारवर असल्याची सांगितले जात आहे.

नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावर, घरावर छापा टाकल्याने खळबळ उडाली होती. कर चुकवेगिरी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचे धाबे यामुळे चांगलेच दणाणले होते. त्यात तब्बल सहा दिवस चौकशी झाल्याने चौकशी नेमकं काय आढळून आलं ? यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.