AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : सोने-चांदीला महागाईचे लागले पाणी! अमेरिकेच्या या धोरणाचा थेट परिणाम

Gold Silver Price Today : सोने-चांदीला महागाईचे पाणी लागले. 19 एप्रिलपासून भावात मोठी उलाढाल झाली नव्हती. पण 3 मेपासून किंमती उसळल्या. अमेरिकेच्या या धोरणाचा मोठा परिणाम झाला..

Gold Silver Price Today : सोने-चांदीला महागाईचे लागले पाणी! अमेरिकेच्या या धोरणाचा थेट परिणाम
आजचा भाव काय
| Updated on: May 04, 2023 | 10:10 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदी (Gold Silver Price Update) पुन्हा सुसाट आहे. दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली. 19 एप्रिलपासून भावात मोठी उलाढाल झाली नव्हती. पण 3 मेपासून किंमती उसळल्या. अमेरिकेच्या या धोरणाचा मोठा परिणाम झाला. आता तुम्ही म्हणाल 13,568 किलोमीटरवरील अमेरिकेच्या कोणत्या धोरणाचा परिणाम झाला असेल? तर अमेरिकेची केंद्रीय बँक युएस फेडरल रिझर्व्हने (American Fed Reserve) अंदाजाप्रमाणे व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर लागलीच दिसून आला. या घोषणेनंतर स्पॉट गोल्डमध्ये 0.8 टक्क्यांची वाढ झाली. युएस गोल्ड फ्युचरमध्ये 1.3 टक्क्यांची वाढ होऊन ते 2,063.20 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

सोन्याने टाकला गिअर सोन्याने दरवाढीचा गिअर टाकला आहे. 3 मेपासून सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांची वाढ झाली होती. आज सोन्यात पुन्हा 500-540 रुपयांची दरवाढ नोंदविण्यात आली. दोन दिवसांत सोन्याच्या भावात 1000 ते 1200 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या धोरणानुसार, सोने-चांदीच्या किंमतीत मोठा बदल होऊ शकतो.

आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 4 मे रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57,150 रुपये आहे. काल हा भाव 56,650 रुपये होता. 24 कॅरेटचा भाव 62,330 रुपये आहे. काल हा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याने आज प्रति 10 ग्रॅम 500-550 रुपयांची उसळी घेतली आहे. तर चांदीने एक किलोमागे 300 रुपयांची आघाडी घेतली. आज एक किलो चांदीसाठी खरेदीदारांना 77,100 रुपये मोजावे लागणार आहे.

RBI ची सोने खरेदी आरबीआयने कोरोनानंतर धोरण बदलविले. केंद्रीय बँकेने सोने खरेदी सुरु केली. जगावर आर्थिक संकट ओढावत असताना, रशिया-युक्रेन यु्द्धानंतर सोने आयात वाढवली. यावर्षीचा विचार केला तर जानेवारी ते मार्च या तिमाहीत आरबीआयने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली. आरबीआयने या तिमाहीत जवळपास 10 टन सोने खरेदी केले.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?