
मुंबई : हरियाणा राज्यात पाऊस (Haryana Rain Updates) मागच्या काही दिवसांपासून सतत सुरु आहे. त्याचा फटका तिथल्या १२ जिल्ह्यांना बसला आहे. 854 गावात पाणी भरले असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. लोकांना घरातून बाहेर पडायला जागा नसल्यामुळे त्याचे हाल होत आहेत. लाईट गायब झाली आहे. काही लोकांना खाण्यासाठी काहीचं मिळत नाहीये, तिथं दाखल झालेली एनडीआरएफ टीम लोकांना मदत करीत आहे. हरियाणा (Haryana Flood News) राज्यातील 3674 लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. मारकंडा, घग्गर, सरस्वती या नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे १२ जिल्ह्यात सगळीकडं पाणीचं पाणी दिसत आहे. यमुना नदीच्या (yamuna river) पाण्याची पातळी सध्या खालावली आहे.
जीटी रोड बेल्टच्या सहा जिल्ह्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. अंबाला, यमुनानगर, करनाल, कैथल, कुरुक्षेत्र आणि पानीपत या जिल्ह्यातील 585 गावांना पूराचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. 4 लाख एकरवरील सगळी पीकं पूर्णपणे खराब झाली आहेत. त्याचबरोबर घग्गर नदीचं पाणी चीका शहरात भरलं आहे. त्याचबरोबर मारकंडा नदीचं पाणी शाहाबादपासून कुरुक्षेत्र पर्यंत पोहोचलं आहे.
यमुनानगरच्या हथिनी कुंड बैराज या ठिकाणी पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे तिथं अधिक धोका जाणवतं आहे. त्याचबरोबर कुरुक्षेत्र शहरात पाणी यूनिवर्सिटीच्या तिसऱ्या गेटपर्यंत गेलं आहे, तिथं सुद्धा एनडीआरएफची टीम लोकांना मदत करत आहे. वायुसेनाने सुध्दा अंबाला येथील सात गावातील लोकांना काल साहित्य पोहोचवलं आहे. आता पाणी पलवल जिल्ह्यात पोहोचलं आहे. पलवल जिल्ह्यात २४ गावात आतापर्यंत पाणी पोहोचलं आहे.
हरियाणा राज्यात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. काल सुध्दा दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. करनालमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आणखी एक व्यक्ती पाण्यातून वाहून गेला आहे. हरियाणा सरकारच्या म्हणण्यानूसार कुरुक्षेत्र, करनाल, कैथल, अंबाला, फतेहाबाद, पानीपत, सोनीपत, यमुनानगर, पंचकूला या जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळं लोकांचा मृत्यू झाला आहे.