दिल्लीत मोठी दुर्घटना! बाजारात तीन मजली इमारत कोसळली; 2 जणांचा मृत्यू , ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

Delhi Building Collapse: आज सकाळी दिल्लीतील चावडी बाजार मेट्रो स्टेशनजवळ एक मोठी दुर्घटना घडली असून तीन मजली इमारत अचानक कोसळली आहे. पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून, सध्या रेस्क्यू काम सुरु आहे.

दिल्लीत मोठी दुर्घटना! बाजारात तीन मजली इमारत कोसळली; 2 जणांचा मृत्यू , ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती
delhi chawri bazar building collapse
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 05, 2026 | 12:16 PM

Delhi Building Collapse: राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत मोठी दुर्घटना घडली असून एक इमारत कोसळली आहे. जुन्या दिल्लीतील चावडी बाजार मेट्रो स्टेशनजवळ गुरुवारी सकाळी एका बांधकाम सुरू असलेल्या तीन मजली इमारत अचानक कोसळून पडली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार, दिल्लीतील चावडी बाजार परिसरातील गली शाहतारा, शीश महल येथील या इमारतीच्या कोसळण्याची माहिती गुरुवारी (५ नोव्हेंबर) सकाळी सुमारे ९.५० वाजता दिल्ली अग्निशमन दलाला मिळाली. हे लोकेशन चावडी बाजार मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर ही दुर्घटना घडली.

Loading...

रेस्क्यू मिशन सुरु!

पडलेल्या इमारतीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने सहा गाड्यासह घटनास्थळी दाखल झालं. यामध्ये तीन वॉटर टेंडर, एक वॉटर बाउझर, एक क्विक रिस्पॉन्स वाहन आणि एक इन्सिडेंट रिस्पॉन्स टीमचा समावेश होता. यासोबतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त अग्निशमन गाड्या आणि अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, पोलीस आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर रेस्क्यू मिशन सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सध्या जोरात सुरु आहे. या दिवाळी आधी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us