
सॉफ्टवेअर इंजीनिअर महिला स्वतःचे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असताना एक रात्र अशी आली, जेव्हा महिलेची हत्या करण्यात आली. तर तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला… 34 वर्षीय महिला घरात असताना एका 18 वर्षीय तरुण खिडकीतून तिच्या घरात घुसला. त्या रात्री महिलेने शारीरिक संबंधास नकार दिल्यानंतर, तरुणाने महिलेची हत्या केली. प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक केली. तेव्हा चौकशी दरम्यान, नराधामाने स्वतःचा गुन्हा कबूल केला..
कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये 3 जानेवारी रोजी एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या करण्यात आली. रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशी दरम्यान, आरोपीने गुन्हा कबूल केला आणि सांगितलं, महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर हत्या केली..
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, 3 जानेवरी रात्री जवळपास 10.30 वाजता राममूर्ती नगर येथील सुब्रमण्य लेआउटमधील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती मिळली. तेव्हा आज विझवण्यासाठी फायर ब्रिगेट आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले… सुरुवातीला शॉर्ट सक्रिटमुळे आग लागली असावी… असं सांगण्यात आलं. पण फॉरेन्सिक तपासणीत एक संशयास्पद प्रकरण उघडकीस आलं. ज्या खोलीत आग लागली ती खोली महिलेच्या फ्लॅटमेटची होती, जी 14 नोव्हेंबरपासून आसाममध्ये राहत होती. पोलिसांना पीडित महिलेचा शेजारी कर्नल कुराईवर संशय होता.
पोलिसांच्या चौकशीनंतर एक धक्कादायक घटना समोर आली.. 3 जानेवारी रात्री 9 वाजता स्लायडिंग खिकडी तोडून पीडित महिलेच्या घरात आरोपी घुसला… त्याला महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. पण महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली… अशात दोघांमध्ये भांडण देखील झालं. आरोपीने महिलेचं तोंड बंद केलं… त्यानंतर महिला बेशुद्ध झाली आणि आरोपीने महिलेच्या रुमला आग लावली आणि मोबाईल घेवून पळून गेला.
अशात पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर, महिलेच्या निधनाचं कारण समोर आलं. तिचं निधन श्वास कोंडल्यामुळे झालं… पोलिसांनी गुन्हा दाखल याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपास सुरू आहे.