Avantipura encounter : अवंतीपुरा चकमकीत 2 दहशतवादी ठार, कैसर कोका या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा, US-made rifle जप्त

| Updated on: Jul 11, 2022 | 4:02 PM

दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर क्रीरी नाक्यावर पोलीस आणि सैन्य दलाची चौकी बसविण्यात आली होती. नाका तपासणीदरम्यान लष्कर ए तोयबाचे दहशतवादी शस्त्र आणि बारुदगोळ्यासह सापडले.

Avantipura encounter : अवंतीपुरा चकमकीत 2 दहशतवादी ठार, कैसर कोका या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा, US-made rifle जप्त
अवंतीपुरा चकमकीत 2 दहशतवादी ठार
Image Credit source: PTI
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय सुरक्षाच्या दलाच्या जवानांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्मिरातील अवंतीपुराच्या वांडाकपोरा चकमकीत सोमवारी ही घटना घडली. लष्कर ए तोयबाचा (Lashkar-e-Toiba) कैसर कोका (Kaiser Koka) असं चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. कोका हा अनेक दहशतवादी घटनांत मोस्ट वाँटेड होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या दहशतवाद्यांकडून शस्त्र, बारुदगोळा तसेच यूएसमध्ये तयार झालेली एम 4 कारबीन रायफल आणि पिस्तुल सापडली. आर्मी 22 आरआरसोबत दहशदवाद्यांची चकमक सुरू होती. बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यात लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तीलग्राम पाईन येथील रहिवासी मोहम्मद इकबाल भट अशी त्याची ओळख पटली. बारामुल्ला जिल्ह्यातील क्रीरी भागातील चेकपोस्टवर अटक करण्यात आली होती.

शस्त्र, दारुगोळा जप्त

नाक्याजवळ तपासणी केली जात होती. संशयित आढळून आले. त्यामुळं ही चकमक उडाली. यात भारतीय सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. ठार झालेला दहशतवादी हा मोस्ट वाँटेड होता. दुसऱ्याची ओळख अद्याप पटू शकली नाही. या दहशतवाद्यांकडून शस्त्र तसेच दारुगोळा जप्त करण्यात आला.

क्रीरी नाक्यावर चौकी

दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर क्रीरी नाक्यावर पोलीस आणि सैन्य दलाची चौकी बसविण्यात आली होती. नाका तपासणीदरम्यान लष्कर ए तोयबाचे दहशतवादी शस्त्र आणि बारुदगोळ्यासह सापडले. त्यांच्याकडे पिस्तुल, बारुदगोळा, पिस्तुलचे सात राऊंड सापडलेत. दहशदवाद्यांना ही शस्त्र, बारुद पुरवठा केला जाणार होता. हे दहशतवादी पाकिस्तानातील दहशतवादी सैफुल्लाह आणि अबू झरारच्या संपर्कात होते.

हे सुद्धा वाचा

दोन दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण

गुरुवारी अवंतीपुराच्या अल बद्र दहशतवाद्यांशी संबंधित दहशतावादी सापडले होते. तपासणीदरम्यान, अब्दुल रशीद पॅरे याचा मुलगा आमीर अहमद पॅरेला अटक करण्यात आली. तो शोपीयन काश्वा चित्रग्राम येथील रहिवासी होती. दहशतवादी अल बद्रशी त्यांची लिंग असल्याचं समोर आलं होतं. मध्यंतरी बुधवारी कुलगाम येथे लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांनी पोलीस आणि सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केले होते. यासंदर्भातील वृत्त एएनआय आणि पीटीआयनं दिलंय.