आसामच्या काझीरंगात मोठा वाहन अपघात, ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरची जोरदार धडक, 20 लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय

आसामच्या काझीरंगात एक भीषण अपघात झाला आहे. रोंगाजन भागात प्रवाशांनी भरलेले ट्रॅव्हलर आणि कंटेनरची जोरदार धडक झाल्याने २३ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

आसामच्या काझीरंगात मोठा वाहन अपघात, ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरची जोरदार धडक, 20 लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय
road accident in aasam
| Updated on: Nov 13, 2026 | 5:37 PM

आसामच्या काझीरंगा येथे शुक्रवारी दुर्दैवी रस्ते अपघात घडला आहे. या अपघातात २० हून अधिक लोकांचा मृ्त्यू झाला आहे. अनेकांची स्थिती गंभीर आहे. हा अपघात रोंगाजान भागात घडला आहे. येथे प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हलर आणि कंटेनर ट्रकची जोरदार धडक झाली आहे. ही टक्कर इतकी भीषण होती की ट्रॅव्हलरचा संपूर्ण चुराडा झाला आहे. अपघाताच्या ठिकाणी लोकांच्या किंचाळ्यांनी परिसर दणादणाला आहे. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात अनेक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शंका आहे.

ट्रॅव्हलर आणि कंटेनरमध्ये जोरदार टक्कर

आसामच्या काझीरंगा येथे प्रवाशांना घेऊन जाणारी टेम्पो ट्रॅव्हलरच्या समोरुन येणाऱ्या कंटेनरची जोरदार टक्कर झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की ट्रॅव्हलरचा चेंदामेंदा झाला. ट्रॅव्हलरमध्ये बसलेल्या प्रवाशांना काही घडते आहे हे समजण्याआधीच त्यांच्यावर काळ बनून कंटेनर धडकला. हा अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. हा अपघातात कंटेनर टेम्पो ट्रॅव्हलरच्या थेट आत शिरल्याने गंभीर जखमीची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघाती मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading...

अपघातात २३ जणांचा मृत्यू

या भीषण वाहन अपघातात आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याच्या बातमीने स्थानिकांना जबर धक्का बसला आहे. गंभीर जखमींच्या प्रकृतीबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे.

मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता

अपघाताची तीव्रता पाहता, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. अपघात कशामुळे झाला किंवा प्रवासी आणि कंटेनर ट्रकची टक्कर नेमकी कशी झाली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. घटनेची तीव्रता पाहता, कॅबिनेट मंत्री अतुल बोरा यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत मदतकार्याची पाहणी केली आहे. त्यांनी २३ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. प्रशासन सध्या अपघातीत जखमींवर उपचार करण्यासाठी लक्ष पुरवत असून  मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us