भारतातील या राज्यात 2779 पुरुषांनी केलेत दोन विवाह, एका सरकारी योजनेने बिंग फोडले

वास्तविक राज्य सरकारच्या या योजनेचा उद्देश्य प्रत्येक कुटुंबातील सदस्याची अचूक माहीती गोळा करणे हा होता. परंतू अनेक जणांनी आपण दोन आणि तीन विवाह केल्याचे उघड केल्या हे आकडे आश्चर्यात टाकणार आहेत.

भारतातील या राज्यात 2779 पुरुषांनी केलेत दोन विवाह, एका सरकारी योजनेने बिंग फोडले
Marriage
| Updated on: Jul 31, 2025 | 9:51 PM

भारतात हिंदू धर्मात दोन विवाह बेकायदेशीर मानले जातात.परंतू भारतातील एका राज्यात तब्बल 2,779 पुरुषांनी आपण दोन विवाह केल्याची कबुली स्वत:च दिली आहे. ही आकडेवारी एका सरकारी योजनेचे अर्ज भरताना लोकांनीच दिली असल्याचे हे सत्य असल्याचे गृहीत धरावे लागत आहे. तर यातील 15 जणांनी दोनहून अधिक विवाह केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली.

हरियाणा राज्यात हरियाणा परिवार पहचान पत्र प्राधिकरणाच्या अर्जांमध्ये ही आश्चर्यकारक माहिती उघडकीस आली आहे. हरियाणा सरकारने त्यांची महत्वाकांक्षी ‘परिवार पहचान पत्र’ योजना सुरु केली आहे.या योजनेतून आश्चर्यकारक आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या योजनेत सामील नागरिकांनी त्यांच्या स्वच्छेने आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती दिली आहे.त्यात पत्नी आणि मुलांची माहीती दिली आहे. यात मजेशीर म्हणजे 2,779 पुरुषांनी आपल्याला दोन बायका असल्याचे मान्य केले आहे. तर 15 पुरुषांनी आपल्या दोनहून अधिक बायका असल्याचे सांगितले आहे. ही माहिती नागरिकांनी स्वत:हूनच दिली असल्याने ती खरी असल्याचे म्हटले जात आहे.

जिल्ह्यांनुसार आकडेवारी

या योजनेसाठी भरलेल्या अर्जातून दोन विवाह करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नूंह जिल्ह्यात सर्वाधिक 353 पुरुषांनी दोन लग्नं केली आहेत. फरीदाबाद 267, पलवल 178, करनाल 171,गुरुग्राम 157,हिसार 152,जींद 147 आणि सोनीपत येथे 134 पुरुषांनी दोन विवाह केले आहेत. पानीपत 129, सिरसा 130, यमुनानगर 111, कुरूक्षेत्र 96, फतेहाबाद 104, कैथल 92, अम्बाला 87, महेंद्रगड 81, रेवाडी 80, रोहतक 78, झज्जर 72, भिवानी 69, पंचकुला 44 आणि चरखी दादरी 30 पुरुषांच्या दोन पत्नी आहेत. काही जिल्ह्यात दोनहून अधिक ( तीन ) पत्नी असणारे पुरुष देखील आहेत. भिवानी, फरीदाबाद, करनाल आणि सोनीपत प्रत्येकी दोन पुरुषांच्या दोनहून अधिक बायका आहेत. हिसार, झज्जर, जिंद, कुरूक्षेत्र, नूंह, पलवल आणि रेवाडीत प्रत्येकी एकाच्या दोनहून अधिक बायका आहेत.

‘परिवार पहचान पत्र’ योजना काय?

गेल्याकाही वर्षांत हरियाणा सरकारने आपल्या सर्व कल्याणकारी योजनांना ‘परिवार पहचान पत्र’योजनेशी जोडले आहे. या योजनेंर्गत प्रत्येक कुटुंबाला त्याच्या घरातील सदस्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. अन्यथा कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही असे म्हटले जात आहे. वास्तविक या योजनेचा उद्देश्य प्रत्येक कुटुंबातील सदस्याची अचूक माहीती गोळा करणे हा आहे. परंतू दोन आणि तीन विवाह केल्याचे उघडकीस आल्याने हे आकडे आश्चर्यात टाकणार आहेत. ही माहिती नागरिकांनी स्वेच्छेने दिलेली असल्याने ती अधिकृत मानली जात आहे.