Ahmedabad Serial Blast: देशात पहिल्यांदाच 38 जणांना फाशी, आरोपींची नावे वाचा एका क्लिकवर

| Updated on: Feb 18, 2022 | 6:32 PM

वर्ष 2002 मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. हे सर्व स्फोट गर्दीच्या ठिकाणी आणि बाजारपेठेत झाले होते. इंडियन मुजाहिदीन (आयएम) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता.

Ahmedabad Serial Blast: देशात पहिल्यांदाच 38 जणांना फाशी, आरोपींची नावे वाचा एका क्लिकवर
प्रेयसीच्या नकारामुळे केला होता आत्महत्येचा प्रयत्न; पाच वर्षांनंतर तुरुंगातून झाली सुटका
Follow us on

अमहदाबाद : गुजरातच्या गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या आणि 2008 साली संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटां (Ahmedabad serial blasts)चा आज विशेष न्यायालया (Special Court)ने फैसला जाहीर केला. मागील सुनावणीवेळी दोषी ठरवण्यात आलेल्या 38 आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गोध्रा हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनने अहमदाबाद शहरातील 21 ठिकाणी लागोपाठ बॉम्बस्फोट घडवले होते. या बॉम्बस्फोटात 56 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता तर 200 हून लोक गंभीर जखमी झाले होते. विशेष न्यायालयाने 14 वर्षानंतर या खटल्याचा निकाल सुनावला आहे. बॉम्बस्फोटातील मृतांना उशिरा न्याय मिळाल्याचे खंत पीडितांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाने अन्य 11 दोषींना आजीवन कारावासाटी शिक्षा सुनावली आहे. (38 convicts sentenced to death in Ahmedabad serial blasts, 11 sentenced to life imprisonment)

इतिहासातील ही पहिलीच वेळ

एकाच वेळी इतक्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. अहमदाबादमध्ये 26 जुलै 2008 रोजी संध्याकाळी 6.45 वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला होता. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला होता. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर 70 मिनिटे आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने घडलवले बॉम्बस्फोट

वर्ष 2002 मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. हे सर्व स्फोट गर्दीच्या ठिकाणी आणि बाजारपेठेत झाले होते. इंडियन मुजाहिदीन (आयएम) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता. इंडियन मुजाहिद्दीनच्या 12 दहशतवाद्यांचा या स्फोटात सहभाग होता. स्फोटांच्या 5 मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता, ज्यामध्ये ‘जे हवे ते करा, थांबवता येत असेल तर थांबवा’, असे लिहिले होते.

या 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली

1. जहीद कुतबुद्दीन शेख (सिमीसाठी फंड गोळा केला आणि या पैशांद्वारे बॉम्बस्फोट घडवले)
2. इमरान इब्राहीम शेख
3. इकबाल कसम शेख (ठक्करनगरमध्ये सायकलमध्ये बाम्ब ठेवला, एएमटीएस बस नं.150 मध्ये स्फोट घडवला)
4. समसुद्दीन शाहबुद्दीन शेख
5. गयासुद्दीन अब्दुल हलिम अंसारी
6. मोहम्मद आरिफ मोहम्मद इकबाल कागजी
7. मोहम्मद उस्मान महम्मद अनीस अगरबत्तीवाला
8. युनुस मोहम्मद मंसूरी
9. कमरुद्दीन चाँद मोहम्मद नागोरी
10.आमिल परवाज काजी सैफुद्दीन शेख
11. सबली उर्फ साबित अब्दुल करीम मुस्लिम
12. सफदर उर्फ हुसेनभाई उर्फ इकबाल जहरुल हुसेन नागोरी (सिमीसाठी फंड गोळा केला आणि या पैशांद्वारे बॉम्बस्फोट घडवले)
13. हाफिज हुसेन उर्फ अदनान ताजुद्दीन मुल्ला
14. मोहम्मद साजिद उर्फ सलीम उर्फ सज्जाद उर्फ साद गुलाम ख्वाजा मंसूरी
15. मुफ्ती अबूबशर उर्फ अब्दुल रशीद उर्फ अब्दुल्ला अबुबकर शेख (बॉम्बस्फोटासाठी मीटिंग्स केली, जिहादी भाषण दिले)
16. अब्बास उम्र समेजा
17. जावेद अहमद सगीर अहमद शेख
18. मोहम्मद इस्माइल उर्फ अब्दुल राजिक उर्फ मुसाफ उर्फ फुरकान महमद इसाक मंसूरी (मणिनगरच्या एलजी हॉस्पिटलमध्ये बॉम्बचे सामान आणि गॅसने भरलेल्या बाटल्या असलेली कार ठेवली)
19. अफजल उर्फ अफसर मुतल्लिब उस्मानी (सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा वॉर्डजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेऊन स्फोट घडवण्यात आला.)
20. महम्मद आरिफ उर्फ आरिफ बदर उर्फ लदन सन ऑफ बदरुद्दीन उर्फ जुम्मन शेख
21. आसिफ उर्फ हसन बशीरुद्दीन शेख
22. कयामुद्दीन उर्फ रिजवान उर्फ अशफाक सरफुद्दीन कापडिया (खोट्या ओळखपत्राद्वारे मोबाईल सिम कार्ड घेतले)
23. मोहम्मद सेफ उर्फ राहुल सागाद एहमद उर्फ मिस्टर शेख
24. जीशान एहमद उर्फ राहुल साबाद एहमद उर्फे मिस्टर शेख
25. जियाउर रहेमान उर्फ मोंटू उर्फ़ जिया अब्दुल रहमानी तेली
26. महम्मद शकील यामिनखान लुहार
27. मोहम्मद अकबर उर्फ सईद उर्फ याकूब उर्फ विनोद इस्माइल चौधरी
28. फजले रहेमान उर्फ रफीक उर्फ सलाउद्दीन मुसद्दिकखान दुर्रानी
29. एहमद बावा उर्फ अबू अबूबकर बरेलवी
30. सरफुद्दीन उर्फ सरफु सन ऑफ ई.टी. सैनुद्दीन उर्फ अब्दुल सत्तर उर्फ अब्दुल सलाम उर्फ सलीम (टायमर बॉम्ब बनवण्यासाठी टायमर चिप बनवली, बॉम्बस्फोट झाला)
31. सैफुर रहेमान उर्फ सैफू उर्फ सैफ अब्दुल रहेमान (वेगवेगळ्या भागाची रेकी करून, बॉम्ब असलेली सायकल घेऊन ती नारोळ सर्कल परिसरात ठेवली.)
32. सादुली उर्फ हारिज अब्दुल करीम मुस्लिम
33. मोहम्मद तनवीर उर्फ तल्हा मोहम्मद अख्तर पठाण
34. आमीन उर्फ राजा अय्यूब शेख
35. महम्मद मुबीन उर्फ इरफान अब्दुल शाहरुख खान
36. मोहम्मद रफीक उर्फ जावीद उर्फ आलमजेब आफरीदी
37. तौसीफ खान उर्फ आतिक एहमदखान पठान
38. मोहम्मद आरिफ नसीम अहमद मिर्झा (38 convicts sentenced to death in Ahmedabad serial blasts, 11 sentenced to life imprisonment)

इतर बातम्या

Amaravati Crime : अमरावतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

Dombivli Murder | अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात