लेबर कोडचा नवा अध्याय सुरु, आजपासून लागू होत आहेत ४ नवे नियम, सॅलरी-सुट्ट्यांवर काय परिणाम?
Labour Code Rules: भारतात श्रम कायद्यात मोठा नवा अध्याय सुरु होत आहे. या संदर्भात केंद्र सरकारने लेबर कोडमध्ये चार मोठे महत्वपू्र्ण बदल केले आहेत.

New Labour Code : भारतात श्रम कायद्यात सुधारणा होण्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरु होती. देशात नवा श्रम कायदा लागू झाल्यानंतर आता नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. केंद्र सरकारने चार नवीन लेबरकोडच्या नियमांना आता पूर्णपणे अधिसूचित केले आहे. या चार नव्या नियमांमध्ये वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा या संदर्भात नवीन नियम लागू झाले आहेत.
1. टेक-होम सॅलरीत येईल कमी
केंद्र सरकारद्वारा जारी केलेल्या नव्या नियमांतर्गत आता तुमची बेसिक सॅलरी तुमच्या एकूण सीटीसी (CTC)च्या कमीत कमी 50 टक्के असणे खूपच अनिर्वाय केले आहे. परंतू या गोष्टीची ही काळजी घ्यावी लागणार आहे की जर बेसिक सॅलरी खूपच कमी असेल तर ती वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. याअंतर्गत तुमच्या पीएफमध्ये योगदान वाढवण्यास मदत होईल. जर तुमच्या हातात पगार दिला जात असेल तर रिटायरमेंट फंड आणि ग्रॅच्युईटी रक्कम वाढण्याचा पर्याय देखील असू शकतो.
2. ग्रॅच्युईटीच्या नियमात झाले मोठे बदल
केंद्र सरकारने नव्या लेबर कोडच्या नियमांना ध्यानात घेऊन ग्रॅच्युईटीच्या नियमात देखील मोठे बदल केले आहे. जेथे आता ‘फिक्स्ड टर्म’ म्हणजे कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांची वाट पाहण्याची प्रक्रिया संपूर्णपणे बंद केली आहे.जर एक वर्षांची सेवा जरी पूर्ण केली तरी कामगारांना अशा प्रकरणात ग्रॅच्युईटी पूर्णपणे मिळण्याचा हक्क असणार आहे.
3. वर्किंग अवर्स सोबत मिळणार सुट्ट्या
नव्या लेबर कोडच्या नियमांनुसार आता आठवड्यात एकूण कामांच्या तासांची मर्यादा ४८ तास करण्यात आली आहे. जर कंपनीला वाटले तर चार दिवसांचा वर्क वीक निवडू शकते., त्यावेळी कंपनीला कर्मचाऱ्यांना तीन साप्ताहिक सुट्या देणे बंधनकारक असेल. एवढेच नाही तर जर कोणताही कर्मचारी ४८ तासांहून जास्त काम करत असेल त्यांना सामान्य हून दुप्पट वेतन ( Double Overtime ) द्यावे लागणार आहे. तसेच आता वर्षातून १८० दिवसाची कठोर मेहनत केल्यानंतर कर्मचाऱ्यांना सुट्टीचे ( Earned Leave ) हक्कदार असतील.
4. महिलांना मिळणार समान संधी
नव्या लेबर कोडमध्ये महिलांना नाईट शिफ्टमध्ये ( सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेदरम्यान ) काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय पुरुष आणि महिलांना कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतनाची गॅरंटी देण्यात आली आहे.