
भारतामध्ये कोणत्याही शहरामध्ये चांगल्या दर्जाचे हॉटेल्स शोधण्यासाठी Oyo कंपनी लोकप्रिय मानली जाते. आजकाल Oyo हॉटेल्स लहान शहरांपासून ते मेट्रोपोलियन शहरांमध्ये पाहायला मिळतात. पण आता Oyo कंपनी एका ठिकाणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. छापेमारीत धक्कादायक दृष्य पोलिसांना पाहायला मिळालं आहे. यूपी पोलिसांनी कोतवाली चांडपा आणि सदर कोतवाली भागात असलेल्या ओयो हॉटेल आणि कॅफेवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 7 तरुण आणि 7 तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत पकडले आणि त्यांच्याकडून आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत.
द व्हॅलेंटाईन हॉटेल रूम्स अव्हेलेबल 24×7… असं हॉटेलच्या बोर्डवर इंग्रजी अक्षरात लिहिलेलं होतं. अशात पोलिसांनी केलेल्या अचानक कारवाईमुळे हॉटेल संचालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ताब्यात घेण्यात आलेल्या 7 तरुण आणि 7 तरुणींची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
सीओ सिटी यांच्या नेतृत्वाखाली एसओजी टीम आणि स्थानिक पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. क्षेत्राधिकार नगर योगेंद्र कृष्ण नारायण यांनी या कारवाईची पुष्टी केली आणि सांगितलं, ‘पोलिसांना याबाबत सतत माहिती मिळत होती की, ओयो हॉटेलमध्ये अनैतिक घटना घडत आहेत. याच माहितीच्या आधारावर पोलिसांना कारवाई केली. आता पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.’
निर्दोष असलेल्यांना कोणत्याही प्रकराची अडचण येणार नाही. परंतु जर कोणी कायद्याचं उल्लंघन करताना आढळलं तर त्याला सोडलं जाणार नाही… असं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक लोकांनी या कारवाईबद्दल सांगितले की, निर्जन भागात असलेल्या या ओयो हॉटेल आणि कॅफेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या.
स्थानिक लोकांनी याप्रकरणी मोठी माहिती दिली आहे. निर्जन भागात असलेल्या ओयो हॉटेल आणि कॅफेमध्ये बऱ्याच काळापासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. आजूबाजूला दुकान किंवा मार्केट नसताना देखील तरुण – तरूणींची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु होती. स्थानिक लोकांनी यांनी सांगितल्यानुसार, याआधी देखील अनेकदा पोलिसांना माहिती देण्यात आली. पण कोणती ठोस पाऊलं उचलली गेली नाहीत.
यावेळी पोलिसांना ठोस माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. स्थानिक लोकांनी हॉटेल मालकाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पोलिस आता अटक केलेल्या मुला-मुलींची चौकशी करत आहेत आणि हॉटेलच्या नोंदी देखील तपासल्या जात आहेत जेणेकरून प्रकरणाची सखोल चौकशी करता येईल. या कारवाईमुळे परिसरातील इतर संशयास्पद हॉटेल्समध्येही दहशत निर्माण झाली आहे.
सांगायचं झालं तर, ओयो हॉटेल्समध्ये अशा छाप्यांच्या बातम्या यापूर्वीही समोर आल्या आहेत. विविध शहरांमध्ये, पोलिसांनी अनैतिक कृत्यांच्या संशयावरून ओयो हॉटेल्सवर कारवाई केली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनावर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.