मन की बात कार्यक्रमाचे 9 वर्ष, खादीपासून ते योगापर्यंत गुगलवर मिळाली नवी ओळख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मन की बात कार्यक्रमाबाबत एक संशोधन समोर आले आहे. SBI आणि IIM बेंगळुरू यांनी केलेल्या या संशोधनात मन की बात कार्यक्रमाचा प्रभाव स्पष्ट करण्यात आला आहे. मन की बातमधून अनेक गोष्टींचा प्रभाव वाढला आहे.

मन की बात कार्यक्रमाचे 9 वर्ष, खादीपासून ते योगापर्यंत गुगलवर मिळाली नवी ओळख
| Updated on: Oct 03, 2023 | 9:51 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या नऊ वर्षांत मन की बात कार्यक्रमाचे एकूण 105 भाग प्रसारित झाले आहेत. पीएम मोदींच्या मन की बात कार्यक्रमासंदर्भात एसबीआय आणि आयआयएम-बंगळुरू यांनी केलेले संशोधन समोर आले आहे, ज्यामध्ये त्याचा परिणाम आणि समाजातील बदलांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

‘मन की बात’ कार्यक्रमामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना खूप लोकप्रिय झाल्याचा दावा संशोधनात करण्यात आला आहे. गुगल सर्चमध्ये त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली. 2015 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा मन की बात कार्यक्रमात पीएम मोदी अनेकदा उल्लेख करतात. ही योजना सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा ठळकपणे उल्लेख करत आहेत.

मन की बात कार्यक्रमामुळे, बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेलाही मोठे यश मिळाले. ही भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे जी विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

गुगलच्या सर्चमध्ये योगाचाही समावेश

संशोधनात योगाचाही उल्लेख करण्यात आला आहे. योग हा शब्द अनादी काळापासून चालत आल्याचे अहवालात म्हटले आहे. 14 डिसेंबर रोजी मन की बात कार्यक्रम लाँच झाल्यानंतर, याला गुगल सर्चमध्ये लोकप्रियता मिळाली. खरं तर, पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा मन की बात कार्यक्रम करायचे तेव्हा ते लोकांना त्यांच्या आयुष्यात योगाचा परिचय करून देण्याचे आवाहन करायचे. 2014 पासून योगाला केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही एक नवी ओळख मिळाली आहे.

खादीला नवसंजीवनी मिळाली

‘मन की बात’ कार्यक्रमामुळे योगासोबतच खादीलाही खूप प्रसिद्धी मिळाली. सध्या लोकांना खादीचे वेड लागले आहे. याआधी जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदी मन की बात बोलत असत तेव्हा मेड इन इंडिया, खादी आणि योगाचा उल्लेख असायचा. त्याचवेळी हळूहळू कमी होत चाललेल्या खादीकडे लोकांचा कल अचानक वाढला. याचा परिणाम असा झाला की खादीची विक्रीही वाढली आणि अनेक प्रकारच्या नोकऱ्याही खुल्या झाल्या. सोशल मीडियावरही खादीला नवी चमक मिळाली.