‘न्यायालय नसेल, लष्कर नसेल आणि यंत्रणा नसेल…’; या माजी राज्यपालांनी गंभीर इशाराच दिला…

| Updated on: May 22, 2023 | 12:02 AM

पुलवामा हल्ल्याचा तपास लागला नाही. चौकशी झाली असती तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा लागला असता आणि त्यांच्याबरोबरच अनेक अधिकाऱ्यांनाही तुरुंगात जावं लागले असते असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

न्यायालय नसेल, लष्कर नसेल आणि यंत्रणा नसेल...; या माजी राज्यपालांनी गंभीर इशाराच दिला...
Follow us on

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आता जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी टीका करताना म्हणाले की, पुढच्या निवडणुकीपर्यंत मतदारांनी यांच्या विरोधात मतदान केले नाही तर ते तुम्हाला मतदानाच्या पात्रतेचे समजणार नाहीत असा घणाघात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.यावेळी मतदार म्हणतील की आम्ही फक्त निवडणुका जिंकतो, मग निवडणुका घेण्याची कारण काय. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची न्यायालये, सैन्य, सुरक्षा आणि कोणतीही यंत्रणा नसणार असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, लोकं मला गद्दार आणि देशद्रोही ठरवत आहेत. मात्र सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, मी प्रामाणिकपणे काम केले आहे. काम करताना मला जम्मू-काश्मीरमध्ये 300 कोटी रुपयांची ऑफर आली होती, मात्र ती मी नाकारली आहे.

हे सगळं असलं तरी आता ते मला अडकवू शकत नाहीत. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी आता माझ्या हाताखालील अधिकाऱ्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू केली आहे.

हा एक प्रकारचा माझ्याविरुद्ध कट रचून मला तुरुंगात पाठवण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अलवर जिल्ह्यातील बनसूरला मलिक आले होते, त्यावेळी त्यांनी बनसूरच्या फतेहपूर गावात राम दरबार मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते.

यावेळी लोकांनी 21 किलो हार घालून त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अदानी हा सरकारचा भागीदार आहे.

ज्यामुळे त्याने 3 वर्षात इतकी संपत्ती कमावली आहे की, तो देशातील सर्वात प्रामाणिक व्यक्तीही बनला आहे. काँग्रेसच्या राहुल गांधींनी संसदेत 20 हजार कोटी रुपयांची विचारणा केली असता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानाकडून मिळू शकले नव्हते. त्यामुळे पंतप्रधान त्यांच्या नावाखाली भ्रष्टाचार करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, यावेळी तुम्ही त्यांची सत्ता उलथवून टाकू शकता. पुलवामामध्ये आमचे 40 जवान शहीद झाले होते.

तेव्हा मी काश्मीरचा राज्यपाल होतो. जेव्हा सीआरपीएफ जवानांची हालचाल होते तेव्हा ते आम्हाला माहिती देण्याऐवजी गृह मंत्रालयाला माहिती देत ​​असत.

पुलवामा हल्ल्याचा तपास लागला नाही. चौकशी झाली असती तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा लागला असता आणि त्यांच्याबरोबरच अनेक अधिकाऱ्यांनाही तुरुंगात जावं लागले असते असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.