Delhi Crime : दुश्मनाचा काटा काढण्याच्या कटात दुसऱ्याच निष्पाप नागरिकाचा बळी; दिल्लीतील धक्कादायक घटना

| Updated on: Jun 24, 2022 | 2:49 AM

गोळीबार झालेल्या परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील इतर सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा केले. तथापि, फुटेजच्या तपासणीतून पोलिसांना कुठली ठोस माहिती हाती लागली नाही. त्यामुळे तपास करणाऱ्या पोलिसांपुढे गोळीबाराचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते.

Delhi Crime : दुश्मनाचा काटा काढण्याच्या कटात दुसऱ्याच निष्पाप नागरिकाचा बळी; दिल्लीतील धक्कादायक घटना
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
Follow us on

नवी दिल्ली : जिममध्ये झालेल्या दुश्मनीतून शत्रूवर पिस्तुलातून झाडलेली गोळी दुसऱ्याच निष्पाप नागरिका (Citizen)ला लागली आणि त्याचा बळी गेला. दिल्लीच्या जामा मशीद (Jama Masjid) परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघा संशयिताना ताब्यात घेतले. त्यांनी चौकशीदरम्यान कबुली दिली. त्याआधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना गुरुवारी अटक (Arrest) केले आहे. दोन व्यक्तींच्या भांडणात निष्पाप पादचाऱ्याचा बळी गेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबार झालेल्या परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील इतर सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा केले. तथापि, फुटेजच्या तपासणीतून पोलिसांना कुठली ठोस माहिती हाती लागली नाही. त्यामुळे तपास करणाऱ्या पोलिसांपुढे गोळीबाराचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते.

पोलीस स्टेशनमधील फोन खणखणला आणि…

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, 21 जून रोजी पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. बंदुकीच्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाल्याचे व तो व्यक्ती रस्त्यावरच पडल्याचे भजनपुरा पोलिस स्टेशनला फोनवरून सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की पीडित व्यक्तीला आधीच जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले आहे. रुग्णालयात डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

अधिक चौकशीदरम्यान आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली

22 जून रोजी पोलिस पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. मिळालेल्या माहितीच्या आधारे 23 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी दोघा संशयितांना थांबवून चौकशी केली. साहिल आणि सैफ अली अशी त्या दोघांची नावे आहेत. चुलत भाऊ असलेल्या या दोघांनी सुरुवातीला पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी अमन नावाच्या व्यक्तीला इजा करण्यासाठी गोळी झाडली होती. पण गोळी अमनला लागण्याऐवजी त्याच्याजवळ उभ्या असलेल्या एका निष्पाप नागरिकाला लागली आणि त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

साहिलने खुलासा केला की तो जवळच्या जिममध्ये जायचा. पण मागील आठवड्यापासून त्याचे अमन नावाच्या व्यक्तीसोबत वारंवार भांडण होत होते. त्याने त्या मुलाला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला व चुलत भाऊ सैफ अलीसोबत एक कट आखला. त्यानुसार 21 जून रोजी दोघांनी सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या गल्लीत अमनला बोलावले. तेथे सैफ अली लोडेड पिस्तूल घेऊन लपून बसला. अमनशी वाद झाल्यानंतर साहिलने चुलत भावाला बोलावून अमनला गोळ्या घालण्यास सांगितले. मात्र, गोळी एका निष्पाप व्यक्तीला लागली. त्या जखमी व्यक्तीला पाहून दोघे घाबरले आणि त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. (A civilian was killed in a mistaken firing in Delhi)