Navi Mumbai Crime : चैन स्नॅचिंग करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात, 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

घटनेतील फिर्यादी आपल्या मित्रासह कामावर जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका मोटर सायकलस्वाराने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून पळ काढला. फिर्यादीने तुर्भे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कल्याण येथील इराणी वस्ती, आंबिवली कल्याणमध्ये सतत तीन दिवस गस्त घालत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Navi Mumbai Crime : चैन स्नॅचिंग करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात, 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
चैन स्नॅचिंग करणारा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 12:45 AM

नवी मुंबई : चैन स्नॅचिंग करणाऱ्या एका सराईत चोरट्याला बेड्या ठोकण्यास तुर्भे पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या आरोपीवर विविध ठिकाणी 9 गुन्हे तर मध्य प्रदेशात एक गुन्हा दाखल आहे. या चोरट्याविरोधात एका चैन चोरी (Chain Theft) प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अटक केल्यानंतर पोलिसांनी चोरट्याची चौकशी (Inquiry) केली असता सदर गुन्हे उघडकीस आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. या चोरट्याचा आणखी कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का ? तसेच त्याच्यासोबत त्याचे साथीदार आहेत का याची चौकशी सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.

सोनसाखळी चोरी प्रकरणी अटक केल्यानंतर अनेक गुन्ह्यांची उकल

घटनेतील फिर्यादी आपल्या मित्रासह कामावर जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका मोटर सायकलस्वाराने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचून पळ काढला. फिर्यादीने तुर्भे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कल्याण येथील इराणी वस्ती, आंबिवली कल्याणमध्ये सतत तीन दिवस गस्त घालत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या आरोपीने नवी मुंबई, मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत असे चैन चोरीचे प्रकार केल्याचे समोर आलं आहे. चोरीला गेलेली चैन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं असून, त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. नवी मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. (Police have arrested a thief involved in chain snatching in Navi Mumbai)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.