अयोध्येतील शरयू नदीत दाम्पत्याचे प्रणय, पती-पत्नीला भाविकांकडून मारहाण, संतांनी केले मारहाणीचे समर्थन

अयोध्येतील शरयू नदीत दाम्पत्याचे प्रणय, पती-पत्नीला भाविकांकडून मारहाण, संतांनी केले मारहाणीचे समर्थन
पती-पत्नीला भाविकांकडून मारहाण

पती-पत्नी नदीत आंघोळ करत आहेत. या घाटावर बाजूला इतर पुरुष आहेत. पण, हे दोघेने तिथ रोमांस करताना दिसून येतात. दोघेही एकमेकाच्या जवळ आहेत. त्यामुळं पाहणाऱ्यांना हा सारा प्रकार विचित्र वाटतो. तिथून काही पुरुष दाम्पत्याकडं येतात. पतीला पत्नीपासून वेगळ करण्याच प्रयत्न केला जातो.

गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 24, 2022 | 3:52 PM

लखनौ : अयोध्येतील शरयू नदीला पवित्र मानले जाते. या नदीत एक दाम्पत्य प्रणय करतानाचा व्हिडीओ काल व्हायरल झाला. हा व्हिडीओत (video) एक युवकानं ट्विटरवर टाकला. यात पती-पत्नी आंघोळ करताना दिसत आहेत. ते दोघेही अतिशय जवळ आहेत. एकमेकांचं चुंबन ( kissing) घेत आहेत. हे पाहून बाजूला आंघोळ करणारे भाविक संतप्त झाले. त्यांनी त्या दाम्पत्याला हटकलं. दोघेही मजा करत होते. शेवटी एकानं हात धरून पतीला बाजूला केलं. तेव्हा त्याची पत्नी त्याला चिपकली. माझ्या पतीने माझ्यापासून वेगळं करू नका, अशा आविर्भावात ती दिसते. तरीही भाविक एकत्र आले. मारो साले को म्हणत पतीला मारहाण (beating) केली. त्यानंतर पतीला हात धरून बाहेर काढण्यात आले. पत्नी त्याच्या मागोमाग गेली.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओत नेमकं काय

पती-पत्नी नदीत आंघोळ करत आहेत. या घाटावर बाजूला इतर पुरुष आहेत. पण, हे दोघेने तिथं रोमांस करताना दिसून येतात. दोघेही एकमेकाच्या जवळ आहेत. त्यामुळं पाहणाऱ्यांना हा सारा प्रकार विचित्र वाटतो. तिथून काही पुरुष दाम्पत्याकडं येतात. पतीला पत्नीपासून वेगळ करण्याच प्रयत्न केला जातो. पण, ती पतीला सोडायला तयार नाही. ती आपल्या पतीच्या मागोमाग जाते. तिथले भाविक संतप्त होतात. पतीला मारहाण करतात. मारहाणा करत-करत त्याला नदीतून बाहेर काढतात.

सार्वजनिक ठिकाणी अशोभनिय कृत्य बरं नव्हे

भाविकांनी पतीला मारहाण केली. या मारहाणीचं श्री रामबल्वभ कुंजचे प्रमुख स्वामी राजकुमार दास यांनी समर्थन केलं. ते म्हणाले, मंदिराजवळील नदीसारख्या सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन योग्य नाही. धर्म, शिष्टाचार पाळायला हवा. अशा घटनांमुळं भाविकांमध्ये चुकीचा संदेश जातो. एकंदरित रामभक्त चांगलेच संतापले होते. त्यामुळं संतांनी या घटनेचे समर्थन केलं. परंतु, या घटनेची तक्रार पोलिसांत करण्यात आली नाही. दाम्पत्यावर हल्ला करणारे कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे. हनुमंत निवासचे महंत डॉ. मिथिलेश नंदिनी शरण म्हणाले, मारहाण करून चांगले केले. सरयू किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी असते. अशा ठिकाणी अश्लील वर्तन हे अशोभनिय आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें