Video : रेल्वेत तरुणी रडली, विनवणी केली, बसू देण्यासाठी TTE पुढे गयावया, रात्रीच्या प्रवासात घडलं असं की…व्हिडीओ व्हायरल!

रेल्वेत गर्दीच्या हंगामात कन्फर्म तिकीट मिळणे म्हणजे मोठे कठीण काम असते. जनरल तिकीटाने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

Video : रेल्वेत तरुणी रडली, विनवणी केली, बसू देण्यासाठी TTE पुढे गयावया, रात्रीच्या प्रवासात घडलं असं की...व्हिडीओ व्हायरल!
Railway girl viral video
| Updated on: Oct 04, 2026 | 11:36 PM

रेल्वेच्या प्रवासात आरक्षित तिकीट मिळण्यासाठी मोठे नशीब असावे लागते. खास करुन ज्यावेळी सुटीचा हंगाम असेल तर भली मोठी प्रतिक्षा यादी हाती पडते. त्यामुळे जनरल तिकीटाने प्रवास करावा लागतो. मात्र, हा जनरलचा प्रवास इतका भयानक असतो की अक्षरश: टॉयलेटमध्ये बसून देखील लोक प्रवास करत असतात. एकीकडे रेल्वेने वंदेभारत सारख्या आलिशान आणि महागड्या गाड्या आणल्या आहेत. मात्र, दुसरीकडे सामान्य डब्यांची संख्या वाढवण्याच्या एवजी कमी झाल्याने रेल्वेचा प्रवास म्हणजे प्रचंड डोकेदुखी ठरली आहे.आता समाजमाध्यमावर एका जनरल तिकीटाने प्रवास करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओतील तरुणीने हावडा वरुन जनरल तिकीट काढले आहे. आणि तिने आरक्षित डब्यात प्रवेश केल्याचे दिसत आहे. ती टीटीईना तिकीटाचा चार्ज भरुन आरक्षित डब्यात बसू देण्याची विनंती करत आहे. परंतू रेल्वेचे अधिकारी तिला नियम दाखवत आहेत. नियमानुसार जरी ही महिला आरक्षित डब्यातून प्रवास करु शकत नसली तरी ती एक महिला असूनही तिला जनरल डब्यात जाण्यास सांगितले जात आहे. यावर विविध प्रतिक्रिया दोन्ही बाजूंनी आलेल्या आहेत. अनेक जण तिच्याकडे आरक्षित तिकीट नसेल आणि जनरल तिकीट असेल तर जनरल डब्यात जावे असे काही युजर्सने म्हटले आहे. तर काही जण ती वुमेन्स कार्ड खेळत असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की याच जागी हिच्याकडे जर आरक्षित तिकीट असते आणि जनरल तिकीटाच्या पुरुषाला तिने बसू दिले असते का ?

Loading...

येथे पाहा व्हिडीओ –

या तरुणीने प्रतिक्रिया देताना आपण हावडावरुन बिहारला जात होतो. रात्र खूप झालेली आणि जनरलमध्ये खूप जास्त गर्दी होती. त्यामुळे मी टीटीईला स्वत: सांगितले की मी पैसे द्यायला तयार आहे, मला केवळ बसण्यासाठी जागा द्यावी, मग मी सुरक्षितपणे घरी पोहचेन. पण कोणी ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे येथे लोक काय प्रतिक्रिया देत आहे हे माझ्यादृष्टीने महत्वाचे नाही असे ही तरुणी म्हणत आहे. रेल्वेची कमी आसने आणि जास्त मागणी ही समस्या लवकर सुटणारी नाही. यासाठी मार्गाचे दुपदरीकरण, चौपदरी करण करणे आणि गाड्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us