
सध्या गिग कामगारांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत. कामाचा योग्य मोबदला आणि आर्थिक, सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी गिग कामगारांनी नुकतेच नववर्षाच्या पूर्वसंध्येला संपाचे हत्यार उपसले होते. ऑनलाईन फुड डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या अशा कामगारांना हवे तेव्हा कामावरून काढून टाकतात. तसेच कमी वेळात फुड डिलिव्हरी करण्याचा तणाव यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या जीवितास निर्माण होत असलेला धोका यामुळे सध्या या कामगारांच प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. असे असतानाच आता एक खासदाराने या कामगारांचे प्रश्नस समजून घेण्यासाठी चक्क डिलिव्हरी बॉय होण्याचे ठरवले.
आम्ही ज्या खासदारांविषयी बोलत आहोत ते आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते नेहमीच्या स्टाइलपासून वेगळे होऊन डिलिव्हरी पार्टनरच्या भूमिकेत दिसत आहेत. ते भारतातील क्विक-कॉमर्स कंपनी ब्लिंकइटचा युनिफॉर्म घालून दिसत आहेत. व्हिडीओत राघव चड्ढा एका डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटीवर बसून पार्सल वाटपासाठी निघताना दिसत आहेत. युजर्स त्यांच्या या स्टाइलवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
डिलिव्हरी पार्टनर झाले राघव चड्ढा
सोमवारी आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी एक व्हिडीओ शेअर करून लोकांना आश्चर्यचकित केले. या व्हिडीओमध्ये ते ब्लिंकइटचे डिलिव्हरी पार्टनर बनून लोकांच्या घरापर्यंत पार्सल डिलिव्हर करताना दिसत आहेत. राघव चड्ढा ब्लिंकइटचे युनिफॉर्म घालून हेल्मेट घालतात, डिलिव्हरी बॅग खांद्यावर टाकतात आणि स्कूटीवर बसून पार्सल वाटपासाठी निघतात. हे ते पाऊल त्यांनी डिलिव्हरी पार्टनर्सना येणाऱ्या समस्या समजून घेण्यासाठी उचलले आहे. व्हिडीओ शेअर करताना राघव चड्ढा म्हणाले, “बोर्डरूमपासून दूर, जमीनीवर. मी त्यांचा दिवस जगला आहे.”
डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या यापूर्वीही उचलल्या आहेत
यापूर्वीही राघव चड्ढा यांनी राज्यसभेत १० मिनिटांच्या डिलिव्हरी पॉलिसीविरोधात आवाज उठवला होता. त्यांचे म्हणणे आहे की, घाईघाईत डिलिव्हरी करताना पार्टनर्स स्वतः अपघाताचा बळी ठरू शकतात आणि रस्त्यावर चालणाऱ्यांसाठीही धोका निर्माण होतो. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर होत आहे. लाखो लोकांनी तो पाहिला असून अनेकांनी लाईकही केले आहेत. युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “राघव चड्ढांना मनापासून सलाम.” दुसऱ्या युजरने म्हटले, “नेता असावा तर असा, स्तरावर उतरून काम केले.” तर आणखी एकाने लिहिले, “राघव चड्ढांनी हे पाऊल योग्य उचलले आहे, समस्या एकत्र राहिल्यानेच समजतात.”